‘संततधार’चा दणका सुरूच
अनेक राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत : उत्तर प्रदेश-बिहारच्या अनेक भागात पूरस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागात परिस्थिती बिकट झाली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा पाहता चारधाम यात्रा पुढे ढकलण्यात आली. हवामान ठीक राहिल्यास सोमवारी प्रवास सुरू होईल. राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून त्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. आसाममधील पुराचा विळखा कायम असून
बिहारमध्ये वीज पडून 10 जणांचा मृत्यू झाला तर उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हरियाणा आणि पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे अनेक संपर्क मार्ग बंद झाले आहेत. गढवाल विभागात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस सोमवारी काहीसा ओसरला होता.
नैनिताल तलावाच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. जोशीमठजवळ पहाटे 4 वाजल्यापासून बद्रीनाथ महामार्ग बंद आहे, त्यामुळे बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबच्या दर्शनासाठी आलेले अडीच हजार यात्रेकरू धाम आणि मुक्कामात अडकून पडले आहेत. आता राज्यात सुमारे 190 रस्ते बंद आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये, शिमला, कांगडा आणि चंबामध्ये नद्या आणि नाल्यांना पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 41 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती बिकट
आसाममधील पूरस्थिती सोमवारीही गंभीर रुप धारण करून होती. 28 जिह्यांतील सुमारे 23 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. बहुतांश नद्यांची पाणीपातळी धोक्मयाच्या चिन्हाच्या वर राहिली आहे. पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या 78 झाली असून केवळ पुरामुळे 66 लोकांचा मृत्यू झाला.