For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम

11:22 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांचा तालुक्यात पाहणी दौरा

Advertisement

खानापूर : तालुक्यात शनिवारी आणि रविवारीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले. खानापूरच्या आठवडी बाजारावर याचा परिणाम दिसून आला. तालुक्यातील पश्चिम भागाचा जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी रविवारी पाहणी दौरा केला. यावेळी जि. पं. सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना विविध सूचना केल्या. आणि खबरदारीच्या उपाययोजनाबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले.

तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. सर्वच नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कही अद्यापही तुटलेला आहे. रविवारी खानापूरचा बाजार असूनदेखील बाजारात लोकांची गर्दी अजिबात दिसून येत नव्हती. शनिवारी दिवसभर आणि रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातून घरांची पडझड होण्याचे प्रकार घडत आहेत.

Advertisement

जिल्हाधिकारी महमद रोशन, जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे तसेच पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी खानापूर तालुक्यातील काही गावांची पाहणी केली. यात जांबोटी परिसरातील कुसमळी येथील पूल तसेच जांबोटी भागातील नदी, नाल्यांच्या पाण्याच्या प्रवाहाची त्यांनी माहिती घेतली. यावेळी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना पावसाळासंबंधी विविध उपाययोजना आणि आवश्यक ठिकाणी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.

Advertisement
Tags :

.