कणकुंबी भागात पावसाचा जोर कायम
अद्याप 1770 मि. मी. पावसाची नोंद : जनजीवन विस्कळीत : विद्युततारा तुटून पडल्याने काही गावे अंधारात
वार्ताहर/कणकुंबी
उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील कणकुंबी भागात पावसाची संततधार सुरूच आहे. यावर्षी अद्याप ( दि. 23 जूनपर्यंत) मे आणि जून महिन्यात एकूण 1570.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे येथील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठ दिवसापासून कणकुंबी परिसरात विजेचा लपंडाव सुरूच असून या भागातील काही गावे अंधारात आहेत. पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली असून, ठिकठिकाणी विद्युत खांब व तारा तुटून पडल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. कणकुंबी येथील एका हॉटेलवर विद्युत खांब पडल्याने हॉटेलचे बरेच नुकसान झाले आहे. संततधारमुळे या भागातील नदी, नाले ओसंडून वाहात आहेत.
कणकुंबी येथील पर्जन्यमापक केंद्रात दि. 23 जूनपर्यंत 1570.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेषत: मे महिन्यात पहिल्यांदाच 531.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दि. 23 मे रोजी 107 मि. मी. व 24 मे रोजी 125.2 मि. मी. पाऊस झाला आहे. जून महिन्यात अद्याप म्हणजे दि. 23 जूनपर्यंत 1039 मिलीमीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. दि. 16 जून रोजी 186.2 मि. मी. पाऊस झाला आहे. यावर्षाच्या चोवीस तासातील सर्वाधिक पावसाची नेंद आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरला असून कणकुंबी भागातील मलप्रभा नदीसह लहान-मोठे सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून काहींच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत. संततधारमुळे सर्व धबधबे प्रवाहीत झाले असून वनखात्याने चिखले धबधबा वगळता अन्य ठिकाणी बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
चिखले धबधबा पर्यटकांसाठी खुला, मात्र पर्यटकांची हुल्लडबाजी
वनखात्याने कणकुंबी भागातील अनेक धबधब्यावर बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. फक्त या भागातील चिखले येथील ‘सवतुरा धबधबा’ पाहण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र चिखले धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्याकडून प्रत्येक व्यक्तीला 60 रुपये फी आकारण्यात येत आहे. वनखात्याने धबधब्याच्या ठिकाणी आपले कर्मचारी ठेवून देखरेख करणे गरजेचे आहे. मात्र कर्मचारी फक्त चिखले, गवसे क्रॉसवरील ऑफीसमध्ये बसून आहेत. धबधब्याच्या ठिकाणी काही पर्यटक दंगामस्ती करत असून, काहींनी तर धबधब्याच्या खाली उतरून जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत आहेत. असे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. काही
धबधबाच्या ठिकाणचा रस्ता दुरुस्त करून पर्यटकांची सोय करा
स्थानिक नागरिकांनी त्या युवकांना समजावून बाहेर काढले. वास्तविक धबधब्याच्या ठिकाणी वनखात्याने आपले कर्मचारी ठेवून खबरदारीची उपाययोजना किंवा कडक पहारा ठेवणे गरजेचे आहे. फक्त पर्यटकांकडून धबधब्याच्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर वनखाते जबाबदारी घेणार आहे का? धबधबाच्या ठिकाणी जाण्यासाठी तीन किलोमीटर धोकादायक रस्त्यावरूंन पर्यटकांना पायपीट करावी लागते. रस्ता दुरुस्ती करून वनखात्याने पर्यटकांची सोय करावी अशी मागणी होत आहे.