महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात पावसाचा जोर कायम

12:10 PM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यात पावसाचा जोर कायम असून मोसमातील दुसऱ्यांदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. काल गुऊवारी एकूण साडेतीन इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचा पाऊस 32 इंच झाला आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गोव्यात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पुढील चार दिवसात तो आणखी वाढण्याची शक्मयता दिसत आहे. पणजी वेधशाळेने एक जुलैपर्यंत सावधानतेचा इशारा जनतेला दिला आहे. यादरम्यान मुसळधार पाऊस पडणार असून जोरदार वादळी वारे तसेच समुद्रातील लाटांची उंची देखील वाढणार आहे. गेल्या 24 तासात राज्यात 3.5 इंच पावसाची नोंद झालेली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात सर्वाधिक सात इंच पावसाची नोंद होंडा येथे झाली. मडगाव येथे साडेचार इंच तर म्हापसामध्ये चार इंच पाऊस झाला. वाळपईतदेखील चार इंच पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement

काणकोणमध्ये देखील चार इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे. केपेमध्ये 3.5 इंच, सांखळीमध्ये तीन इंच, पेडणे व सांगे येथे देखील प्रत्येकी तीन इंच, जुने गोव्यामध्ये 2.5 इंच, तर पणजी 2.5 इंच पावसाची नोंद झाली आहे.  या 24 तासातील जोरदार पावसामध्ये दाभोळी आणि मुरगाव येथे देखील प्रत्येकी 2.5 इंच पाऊस नोंदविला गेला आहे. आगामी 48 तासात गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, गुऊवारी दिवसभर पावसाचरिपरिप चालू होती आणि त्यामुळे हवेत कमालीचा गारवा होता. दरम्यान हवामान खात्याने समुद्रकिनारी राहणाऱ्यांना तसेच पारंपरिक मासेमारी करणाऱ्या होडी चालकांना आपल्या होड्या समुद्रात नेऊ नका असा इशारा देऊन रेड अलर्ट घोषित केला आहे. यानुसार आज लाटांची उंची साडेतीन मीटरपेक्षाही वरती जाण्याची शक्मयता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article