For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिरज तालुक्यात विजांच्या कडकडाट व वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

06:02 PM Nov 28, 2023 IST | Kalyani Amanagi
मिरज तालुक्यात विजांच्या कडकडाट व वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी
Advertisement

Advertisement

मिरज प्रतिनिधी

मिरज पूर्व भागातील खंडेराजुरी ,सिदेवाडी, एरंडोली आरग ,बेळंकी, भोसे सह अनेक गावामध्ये मंगळवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली.  अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसाने  सगळीकडे पाणीच पाणी केले होते. कष्टातून पिकवलेल्या व हाता तोंडाला आलेल्या द्राक्षबागा फुलोऱ्यामध्ये व विक्रीसाठी तयार झालेल्या द्राक्ष बागांना मात्र जोरदार तडका बसला आहे.

खंडेराजुरी परिसरात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Advertisement

खंडेराजुरी (तालुका मिरज ) परिसरात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाट व वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्षबागा व शाळु पिकाचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

द्राक्ष बागेच्या छाटणीनंतर 35ते 42 दिवसात फ्लॉवरिंग, फुलकळी मध्ये अनेक द्राक्षबागा आहेत तर आगाप छाटणी घेतलेल्या व विक्री योग्य तयार झालेल्या अनेक द्राक्ष बागेच्या घडामध्ये पावसाचे पाणी साठल्याने कुजव्या सारखे रोग होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागत आहे. तसेच फुलोऱ्यात असणाऱ्या शाळु पिकाला सुद्धा या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे.

म्हैसाळ सह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले

म्हैसाळ सह परीसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग तासभर कोसळलेल्या पावसामुळे परीसरात पाणीच पाणी झाले . गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने रब्बी हंगाम धोक्यात आला होता.यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आज मंगळवारी दुपारी दीड वाजता आकाशात ढगाळ वातावरण होते.दुपारी अडीच वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली.तब्बल तासभर कोसळलेल्या पावसामुळे सगळे रस्ते जलमय झाले होते.तर गावातील गटारी तुडुंब भरून वाहत होते.सदरचा पाऊस गहू,मका,शाळु, हरभरा यासारख्या रब्बी हंगामातील पिकांना उपयुक्त ठरला आहे.तर नुकतीच परीसरात ऊसतोड हंगाम सुरवात झाली होती मात्र या पावसाने परत एकदा ऊसतोड काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. म्हैसाळ, नरवाड, विजयनगर, ढवळी आदी भागात चांगला पाऊस झाला.

Advertisement
Tags :

.