बसवण कुडची, निलजी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द येथे चुरशीने मतदान : मतदारांत उत्साह
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये लोकसभेची निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. सकाळी सात वाजता मतदानाला सुऊवात झाली. बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी ,मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनीहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मावीनकट्टी, मारिहाळ, सुळेभावी आदी गावांमध्ये सकाळी बारापर्यंत मतदारांची गर्दी होती. त्यानंतर उन्हाच्या तडाख्यामुळे मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. त्यामुळे सायंकाळी चारपर्यंत मतदारांची संख्या तुळरक स्वरूपात पाहण्यास मिळाली. तर नवीन मतदारांमध्येही उत्साह पाहावयास मिळाला.
सांबरा येथील मतदान केंद्रांना परदेशातील पथकाची भेट
दरम्यान, सांबरा येथे सिंगापूर, इंडोनेशिया, नेदरलँड, मांडवा, नेपाल, ट्युनिशिया आदी देशांतील सदस्य असलेल्या पथकाने मतदान केंद्रांना भेट दिली व भारतामध्ये मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, याची पाहणी केली. यावेळी स्थानिक मतदारांशी त्यांनी गप्पागोष्टीही केल्या. यावेळी येथील मतदान प्रक्रिया पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.