कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उष्णतेचा फटका... फळांच्या दरात वाढ

11:39 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाजारात सर्वच फळांचे दर वाढल्याने नाराजी : पारंपरिक फळांच्या रसाला जनतेची अधिक पसंती

Advertisement

पणजी : राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून, या उष्णतेचा फटका फळे खाणाऱ्यांना बसत आहे. फळांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच उष्णतेचा बचाव करण्यासाठी लोकांनी फळांची आहारात वाढ केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे कलिंगड, द्राक्षे, संत्रे, शहाळे, कोकम सरबत, लिंबू पाणी, सफरचंद, केळी तसेच अन्य विविध फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात फळे विक्रेत्यांनी तसेच ज्युस सेंटरमध्ये याच्या किमती काही प्रमाणात वाढविल्या आहेत. राज्यात मागील काही वर्षांपासून उष्णतेचा पारा वाढत आहे. यंदा हिवाळी हंगाम नोव्हेंबर डिसेंबर फक्त दोनच महिने काही प्रमाणात मिळाला. जानेवारीपासून पुन्हा उष्णतेचा पारा चढायला सुरवात झाली. या वाढत्या उष्णतेमुळे लोक आता आरोग्यदायी आहारावर भर देत असल्याने अशा पौष्टिक आहाराची, फळांची मागणी वाढली आहे. आणखी पुढील दोन महिने ही असहाय्य उष्णता सहन करावी लागणार आहे. त्यामुळे या फळांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. राज्यात सध्या दुपारचा उष्णतेचा पारा 36 अंश सेल्सियस पर्यंत जात असतो. त्यामुळे दुपारी 11 ते सांय 4 पर्यंत बाहेर फिरणे कठीण झाले आहे. यामुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. आता हिवाळी हंगाम कमी झाला असून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी काही प्रमाणात थंडी असते. परंतु शहरात दिवसरात्री गर्मीमुळे लोक त्रस्त आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या शीतपेयापेक्षाही पारंपरिक फळांच्या रसाकडे लोक वळत आहेत.

Advertisement

फळांच्या किंमतीत वाढ

वाढत्या उष्णतेमुळे फळांच्या किमंती मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. कलिंगड  30 ऊपये प्रती किलोने विकले जात आहे. संत्री 120 ऊपये प्रती किलो, द्राक्षे 100 ऊपये प्रती किलो, लिंबू 10 ऊपयाला एक, सफरचंद 200 ऊपये किलो , चिकू 100 ऊपये किलो, लहान केळी 60 ऊपये डझन , मंडोळी केळी 60 किलो, डाळिंब 200 ऊपये किलो, पेरू 120 ऊपये किलो तर शहाळे  60 ऊपये एक अशी विकली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे या फळांची मागणी वाढली आहे.

आंब्याच्या अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न?

पणजी बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विक्रीस आले आहेत. हापूस, तोतापुरी, मानकुराद, साखरी, पायरी असे आंब्याचे प्रकार विक्रीस उपलब्ध आहेत. मानकुराद 4000 ते 5000, हापूस 1200 ते 1500, तोतापुरी 150 ते 200 आणि साखरी आंबे 400 ऊपये, पायरी 800 ते 900 अशा दरात विक्रीस उपलब्ध आहेत. अजून तसा आंब्याचा हंगाम सुरू झालेला नाही. त्यामुळे या आंब्याच्या अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. की हे खरेच हंगामी आहेत की कृत्रिम की रासायन घालून पिकविले जात आहेत. जनतेच्या आरोग्याचा विचार करून अन्न आणि औषद प्रशासनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. पणजी येथे फळ मार्केटमध्ये काही प्रमाणात हापूस आंबे रत्नागिरीतून आले आहेत. त्यांचे दर आवाक्याबाहेर आहेत. स्थानिक मानकुराद आंब्याची आवकही खूप कमी आहे. सामान्यांना मानकुरादचा दर परवडणारा नाही. मांगिलाल व मल्लिका हे आंबे ही गोव्याबाहेरून दाखल झाले असून, काही फळ विक्रेत्यांकडे 200 ते 250 ऊपये विक्री होत आहे अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article