For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीट-युजी संबंधी आज ‘सर्वोच्च’मध्ये सुनावणी

06:00 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीट युजी संबंधी आज ‘सर्वोच्च’मध्ये सुनावणी
Advertisement

उमेदवारांसह संपूर्ण देशाचे लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नीट-युजी 2024 परीक्षेतील कथित अनियमिततेवर सर्वोच्च न्यायालयाचा आज म्हणजेच गुऊवारी मोठा निर्णय येऊ शकतो. परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

Advertisement

15 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केंद्र आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्यासाठी गुऊवारपर्यंत सुनावणी तहकूब केली होती. 11 जुलै रोजी केंद्र सरकारने या परीक्षेत कोणत्याही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा इन्कार करत या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून चार फेऱ्यांमध्ये समुपदेशन केले जाईल, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याव्यतिरिक्त कोणताही उमेदवार अनियमिततेत सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीची उमेदवारी समुपदेशन प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतरही कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल, असा दावाही त्यात करण्यात आला होता. याचदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने केलेल्या माहिती संकलनातून मोठ्या प्रमाणात अनियमितता किंवा असामान्य गुणांमुळे उमेदवारांच्या स्थानिक गटाला कोणताही फायदा झालेला नाही, असे आढळून आले होते.

Advertisement
Tags :

.