For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोळेश्वरच्या उपनगरात कचऱ्याचे ढीग

03:14 PM Sep 11, 2025 IST | Radhika Patil
गोळेश्वरच्या उपनगरात कचऱ्याचे ढीग
Advertisement

कार्वे :

Advertisement

गोळेश्वर (ता. कराड) येथील ग्रामपंचायत गावठाणातील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी कचरा डेपो कृष्णा नदीकाठी टाकून देण्यास विरोध केला असल्यामुळे गेले पंधरा-वीस दिवस गोळेश्वर नवीन कराड तासगाव रोडवरील कार्वे नाका ते कार्वे पुलापर्यंत दोन्ही बाजूला सगळीकडे कचरा टाकला गेला आहे. शंभू महादेव नगर, राज नक्षत्र, माऊली पार्क येथील साधारण एक ते दीड हजार फ्लॅटधारक आहेत. परिसरातील लोकांनी कचरा रस्त्यावर टाकला आहे. तसेच अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक कचऱ्याचा ढीगच पाहण्यास मिळतो.

गोळेश्वर ग्रामपंचायत हद्दीत अनेक वसाहती आहेत शंभूमहादेवनगर, हिराई चव्हाण नगर, सावकरनगर, वृंदावन कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, सुभद्रानगर यासह अनेक वसाहतींचा समावेश आहे. याठिकाणचा कचरा गोळा करण्यासाठी गोळेश्वर ग्रामपंचायतीची घंटागाडी एक दिवस आड यायची आणि नदीकाठी कचरा ठेवला जायचा. मात्र येथील ग्रामस्थांनी मच्छर व रोगराईच्या भीतीने कचरा ठेवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे काही दिवसापासून कचरा ग्रामस्थांच्या घरातच असल्याने घंटागाडीची वाट पाहून त्यांनी जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकून दिला आहे. त्यामुळे या कॉलन्यात कचऱ्यांचे ढीग दिसू लागले आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी चालू करावी, अशी मागणी गोळेश्वर उपनगरामधील रहिवाशांनी केली आहे. त्यासाठी माजी सरपंच शिवाजी जाधव, सचिनकुमार पाटील, रवींद्र जाधव, शिवाजी कदम यांनी गटविकास अधिकारी, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद या निवेदने दिलेली आहेत.

Advertisement

  • ग्रामपंचायतीचे आमदारांना साकडे

गोळेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व उपनगरातील कचऱ्याचे संकलन व्हावे व रहिवाशांच्या कचऱ्याची समस्या दूर व्हावी यासाठी ग्रामपंचयतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना भेटले असून यामधून मार्ग काढण्याचे तयारी त्यांनी दर्शविली आहे.

                                                                                                                   -चंद्रकांत काशीद, सरपंच गोळेश्वर

Advertisement
Tags :

.