Kolhapur News : आरे धनगरवाडीत शोककळा; ऊस भरताना शेतकऱ्याचा मृत्यू
आरे येथील शेतकऱ्याचा ऊस भरताना फळीवरून पाय घसरून मृत्यू
सडोली खालसा : आरे (ता. करवीर) येथील धनगरवाडीतील तरुण शेतकरी मानसिंग नारायण देवकर (वय 46) यांचा ऊस ट्रॉलीत भरत असताना पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तरुण शेतकऱ्या च्या झालेल्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवारी सकाळी पावणे अकरा वाजता गाडेगोंडवाडी आरे येते घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसिंग देवकर हे शेतीबरोबरच गेली 7 ते 8 वर्षे दालमिया साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीचे काम करीत होते. रविवारी नेहमीप्रमाणे ते ऊस ट्रॉलीत भरत असताना ऊस भरण्यासाठी लावलेल्या फळीवरून ऊस भरत असताना त्यांचा पाय घसरला. नाक व कपाळाला जोरदार मार बललेने ते गंभीर जखमी झाले.जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले
. मानसिंग देवकर हे एकुलतेच मुलगे असून कुटुंबातील आई-वडील वयोवृद्ध आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या अचानक निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.