महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प फाऊंडेशन-वेणुग्रामतर्फे पारवाडमध्ये आरोग्य तपासणी

11:23 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील पारवाड येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 75 हून अधिक ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. उच्च रक्तदाब, मधुमेह यासह इतर तपासण्या करण्यात आल्या. लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य व शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सामाजिक कार्यातून या सुविधा पोहोचविल्या जात आहेत. डॉ. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून 32 गावे दत्तक घेऊन  आरोग्याच्या सुविधा पोहोचविल्या जात आहेत. यावेळी वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. सना हुदली, पीआरओ श्रीकांत पाटील, जगदीश बेळगावकर, योगेश देशपांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article