सांगलीकरांचे आरोग्य धोक्यात
शेरीनाल्या दुषित पाणी मुख्यमंत्र्यांना पाठवले
सांगली :
गेल्या साठी- सत्तर वर्षांपासून शेरीनाल्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असूनही सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडली आहे. चालू वर्षी दिवाळीला मोटारी चालू करून पाण्याचा उपसा करायला हवे होता. खरं सुस्त प्रशासन टक्केवारी आणि वेगवेगळ्या बाबतीत व्यस्थ असल्यामुळे याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेरी नाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे इथे रोज पोहायला येणारे नागरिक आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून हे दुषित पाणी नवनिर्वाचित मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि शहराचे आयुक्त यांना पाठविले आहे, अशी माहिती सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी दिली.
ते म्हणाले, या सर्व पदाधिकारींनी या पाण्याचा दर्ज पाहून तर या शेरीनाल्यावरील एसटीपी प्लांटच्या प्रस्तावाला मंजूरी द्यावी. हा प्रस्ताव गेले ६ महिने धुळ खात पडला आहे. आमची ही मागणी पूर्ण झाली नाही तर याच दुषित पाण्याने या सर्व पदाधिकाऱ्यांना अभिषेक घातल्याशिवाय सांगलीकर आता स्वस्थ बसणार नाहीत. नागरिक जागृती मंचाच्यावतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी दुषित पाणी पाठवले असल्याचेही यावेळी सांगितले.