कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संभाव्य पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज

12:30 PM May 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

कोल्हापूर जिल्हा हा पूर प्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिह्यात पूर परिस्थिती निर्माण होते. यंदाच्या पावसाळ्यात जिह्यात संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाने पूर परिस्थितीत आरोग्य सेवा पुरविण्याचे व पूर ओसरल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीचे सुक्ष्म नियोजन केले आहे. पूर परिस्थितीत आवश्यक उपाय योजना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या असून आरोग्य विभाग आतापासूनच दक्ष झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.

Advertisement

आरोग्य विभागाने यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थितीबरोबरच साथरोग नियंत्रणासाठी काटेकोर नियोजन केले आहे. 5 सामान्य, उपजिल्हा रुग्णालये, 18 ग्रामीण रुग्णालये, 76 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 416 उपकेंद्रामार्फत 1 हजार 225 गावातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 36 रग्णवाहिका (108 क्रमांक) आणि 76 रुग्णवाहिका (102- क्रमांक) आदी यंत्रणा आरोग्य विभागाच्या दिमतीला सज्ज आहेत.

साथरोग प्रतिबंधासाठी आणि संभाव्य पूर परिस्थिती मध्ये छावण्यांसाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. पुरामुळे बाधित होणाऱ्या गावामध्ये निवारा (छावणी) मध्ये आरोग्य पथकाची स्थापना करण्यात आली आहे. छावण्याव्यतीरिक्त 267 पूरबाधित गावांमध्ये ट्रान्झिट आरोग्य पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पंचायत समिती हातकणंगले, शिरोळ, उपकेंद्र घोसरवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठेगुलंद व सर्व तालुका अधिकारी कार्यालयामध्ये औषधांचा साठा (बफर स्टॉक) करण्यात येत आहे. पूरबाधित होणाऱ्या गावात रुग्णवाहिकेची सुविधा, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी मेडीक्लोर, क्लोरीन गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक गोळ्यांचेही वाटप करण्याचे नियोजन केले आहे. तर पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी 76 आरोग्य केंद्रे व 416 उपकेंद्रांमध्ये मेडीक्लोर उपलब्ध करण्यात येत आहे. सर्पदंशासह इतर सर्व अत्यावश्यक औषधे पुरेशा प्रमाणात संस्था स्तरावर उपलब्ध करुन ठेवली आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकरचे शुद्धीकरण, निवारा (छावणी) मध्ये स्थलांतरीत होणाऱ्या सर्व महिला, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्याचे नियोजित आहे. संभाव्य पूर परिस्थितीत जिह्यातील सुमारे 391 पूर बाधित होणाऱ्या गावातील 44 हजार 706 कुटुंबातील 1 लाख 94 हजार 464 लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कोटेकोर नियोजन केले आहे.

जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. संभाव्य पूर बाधित गावात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी खासगी डॉक्टर, परिचारिका यांचा सहभाग घेण्यात येणार असून पुरेशा प्रमाणात औषधसाठा व किटची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. जिल्हा हितवाप अधिकारी कार्यालयात 20 फॉगिंग मशीन, नगरपरिषदांकडे 23, महापालिका-15, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी 99 आणि ग्रामपंचायतीमध्ये 127 असे 284 फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत

जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रसुती होणाऱ्या सुमारे 5 हजार 300 गरोदर मातांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यामध्ये पूरभागातील 2406 संभाव्य गर्भवती मातांना प्रसुतीपूर्वी 8 दिवस अगोदर नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा मातांना दाखल करणे, मातेसह एका नातेवाईकाची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार असून सर्व आरोग्य संस्थेच्या ठिकाणी प्रसुतीसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.

पूर परिस्थिती उद्भवल्यास पूर ओसरल्यानंतर साथरोग प्रतिबंध व रोगराई न पसरू नये म्हणून उपाय योजना करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागात ताप, जुलाब आदी साथरोगाच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन सर्व्हेक्षण, पिण्याच्या पाण्याच्या स्त्राsतांचे दैनंदिन शुद्धीकरण, परिसर, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, कीटकजन्य आजार नियंत्रण, पूर ओसल्यानंतर धुरळणी (डस्टिंग) व मॅलेथियॉन 5 टक्के पावडर फॉगिंग मशिन लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करुन ठेवण्यात आली आहे. एकंदरीत संभाव्य पूर परिस्थितीमध्ये आणि पावसाळ्यात साथरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने परिपूर्ण नियोजन केले असून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग दक्ष आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article