लोककल्पतर्फे चिखले येथील शिबिरात 70 जणांची आरोग्य तपासणी
11:10 AM Sep 11, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे वेणुग्राम हॉस्पिटलच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील चिखले येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश ग्रामीण भागाला आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा होता. या अंतर्गत जवळपास 70 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. निर्मला एम., परिचारिका नेत्रा, पीआरओ जगदीश बेळगावकर यांनी सेवा बजावली. तसेच लोककल्प फौंडेशनतर्फे अनंत गावडे आणि संदीप पाटील यांनी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान दिले. हा उपक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या नेतृत्वात झाला असून ग्रामीण भागाचा विकास, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article