For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य सेवा आता नागरिकांच्या दारी

01:53 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरोग्य सेवा आता नागरिकांच्या दारी
Advertisement

के एल ई रुग्णालयाचा उपक्रम : डॉ. प्रभाकर कोरे : उज्वलनगर येथे रुग्णालयाचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव

आरोग्य सेवा नागरिकांच्या दारी पोचविण्यासाठी शहर आणि इतर भागांमध्ये के एल ई संस्थेकडून रुग्णालय सुरू करण्यात येत आहेत. बेळगाव शहरांमध्ये चार केंद्र सुरू करून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहेत. आता उज्वल नगर येथे सुरू करण्यात येत असलेल्या सेवेचा नागरिकांनी सदुपयोग करून घ्यावा. असे आवाहन के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.

Advertisement

उज्वल नगर येथे सुरू करण्यात आलेल्या नूतन रुग्णालयाचे उद्घाटन करून ते बोलत होते बोलताना ते म्हणाले शिक्षणामुळे समाज सुधारणा शक्य आहे त्याबरोबरच शिक्षणासह आरोग्यसेवा देणे ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांच्या दारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे अत्याधुनिक सोयीनी युक्त असणारे हे रुग्णालय आहे माफक दरामध्ये उपचार देण्यात येत आहेत किडनी, हृदय, लिव्हर प्रत्यारोपण, श्वासकोश प्रत्यारोपण अत्यंत माफक दरामध्ये करून देण्यात येत आहेत. यासाठी रुग्णालयाच्या डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी अमेरिकेला पाठविण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले. दररोज दहा जणांना कॅन्सर रोगाची बाधा होत आहे. यासाठी बेळगाव मध्ये 300 बेडचे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. अत्याधुनिक सेवा सुविधा असणारे हे रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल केले जाणार आहे. लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये कार्यरत असण्राया संस्थेतील रुग्णालयांमध्ये जात धर्म न पाहता शिक्षण आणि चिकित्सा दिली जात आहे. सध्याच्या जीवनशैली व खाद्य पदार्थांमुळे आरोग्यावर परिणाम होऊन रुग्ण संख्या वाढत आहे. यासाठीच आयुर्वेदिक, होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्यात येत आहेत. नागरिकांच्या दारी सेवा देण्यात आहे. या सुविधांचा लाभ घ्यावा नागरिकांनी आरोग्यवंत राहावे असे आवाहन त्यांनी केले.

आमदार राजू शेठ बोलताना म्हणाले डॉ. कोरे हे दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व आहे. 2013 मध्ये आपल्याला तातडीने हृदय चिकित्सा करणे आवश्यक होते. अशावेळी सर्वांना मुंबई बंगलोर हैदराबाद अमेरिका या ठिकाणी जाण्याचे सल्ले दिले जात होते. मात्र डॉ. कोरे यांनी याच ठिकाणी उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आपण आरामदायी झालो आहोत. कमी खर्चामध्ये केलई संस्थेत उपचार उपलब्ध आहेत. याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. यावेळी के एल ई संस्थेचे संचालक डॉ. एस व्ही साधूनावर, काहेरचे कुलगुरू डॉ.नितीन गंगाने, निबंधक डॉ. एम एस गणाचारी डॉ. व्हि डी पाटील, डॉ.एच बी राजशेखर, व्हॉइस प्रिन्सिपल डॉ व्ही एम पट्टणशेट्टी, यांच्यासह आदी उपस्थित होते. डॉ. अरिफ मालदार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जेएनएमसी चे वाईस प्रिन्सिपल डॉ.राजेश पवार यांनी आभार व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.