For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सनरायझर्स हैद्राबाद संघात हेड दाखल

06:12 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
सनरायझर्स हैद्राबाद संघात हेड दाखल
Advertisement

वृत्तसंस्था/ हैद्राबाद

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा आक्रमक फलंदाज ट्रेव्हिस हेड 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी सनरायझर्स हैद्राबाद संघात दाखल झाला. 30 वर्षीय हेडने भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले होते. गेली 6 वर्षे तो आयपीएल स्पर्धा खेळत आहे.

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ झाला असून हेडने या शिबिरात बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. 2017 च्या आयपीएल स्पर्धेत हेडने आरसीबीचे प्रतिनिधित्व केले होते. डावखुरा फलंदाज ट्रेव्हिस हेड आता सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. सनरायझर्स हैद्राबादने 2024 च्या आयपीएल स्पर्धेसाठी पॅट कमिन्सची कर्णधारपदी नियुक्ती केली. यापूर्वी अॅडेन मार्कक्रेम या संघाचा कर्णधार होता. 2018 च्या आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैद्राबादने उपविजेतेपद मिळविले होते. त्यावेळी न्यूझीलंडचा केन विल्यम्सन हैद्राबाद संघाचा कर्णधार होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.