महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्म, अकर्म जाणणारा मर्त्यलोकातून मुक्त होतो

06:29 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, आपल्या हातून होणारे कर्म ईश्वराला पसंत पडेल का? असा  विचार करावा आणि मगच योग्य निर्णय घ्यावा. यासाठी ईश्वराला स्मरून कार्य करा असं संत सांगतात. असं असलं तरी मनुष्य इच्छा आणि अज्ञान ह्या दोन गोष्टींमुळे संसारात अडकतो. निरपेक्षतेनं कर्म करावं हा परमार्थाचा पाया आहे पण संपूर्ण निरपेक्षता साधणं सोपं नसतं. काही ना काही अपेक्षा माणसाच्या मनात असतात. या अपेक्षा सात्विक, राजस वा तामसी असू शकतात आणि केलेलं कर्म त्यानुसार सात्विक, राजस वा तामसी होतं. बरं, सामान्य माणसाचीच अशी अवस्था असते असं नाही तर मोठमोठे ऋषीमुनी वेळेनुसार काही ना काही अपेक्षा बाळगूनच कर्मे करत असतात. साहजिकच या सर्व कर्मांचं अकर्मात रूपांतर होत असतं. ईश्वरी कार्य हे संपूर्ण निरपेक्ष कार्य म्हणता येईल.

Advertisement

मुमुक्षु साधकाला पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका करून घ्यायची असते. त्याला हे माहीत असते की, जर आपण काही अपेक्षेने कर्मे केली तर आपल्या खात्यावर पाप किंवा पुण्य जमा होईल आणि ते भोगण्यासाठी आपला पुनर्जन्म होईल. तो टाळण्यासाठी तो अत्यंत दक्षतेने निरपेक्षतेने कर्मे करत असतो. असं जरी असलं तरी तो कर्मे करत असताना केव्हा अकर्मे करू लागतो हे त्याला कळत नाही किंवा अकर्म करत असताना तो पुन्हा कर्माकडे वळत नाही. म्हणून बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत की मुमुक्षुने कर्म, अकर्म ह्याबद्दल सविस्तर जाणून घेतले तर तो जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होईल.

क्रियायामक्रियाज्ञानमक्रियायां क्रियामति ।

यस्य स्यात्स हि मर्त्ये स्मिँल्लोके मुक्तो खिलार्थकृत् ।।24।।

अर्थ- कर्माचे ठिकाणी अकर्माचे ज्ञान व अकर्माचे ठिकाणी कर्माचे ज्ञान ज्याला असेल तो या मर्त्यलोकातून मुक्त होतो व सर्व पुरुषार्थ संपादन करतो.

विवरण- ईश्वराने आपल्या पूर्वप्रारब्धानुसार काम नेमून दिलेलं असतं ते कर्म होय आणि ते आपण ईश्वर स्मरणात राहून निरपेक्षतेनं करायचं हे आपलं कर्तव्य आहे. ते कर्म करण्यासाठी जशी ईश्वरी प्रेरणा मिळेल त्याप्रमाणे त्यानं कर्म करत रहायचं आहे. हे मूळ तत्व आहे. प्रत्यक्षात मनुष्य, अगदी मुमुक्षुसुद्धा ते कर्म करत असताना त्याला आपण कर्ते नाही ह्याचा विसर पडतो आणि त्याच्या मनात स्वार्थ साधून घेण्याचे विचार येऊ लागतात. त्यासाठी स्वत:च्या डोक्याने किंवा बुद्धिनुसार तो कर्म करत राहतो किंवा दुसरंच काही करू पाहतो. हे सर्व अकर्म या सदरात मोडतं. म्हणून बाप्पा म्हणतायत कर्म करायचं सोडून आपण अकर्म करतोय हे समजलं तर त्यातून बाहेर पडून कर्म करता येतं. थोडक्यात वाट्याला आलेलं कर्म करताना माणसानं स्वत:चं डोकं लढवणं ईश्वराला अपेक्षित नाही. अर्जुनाने वाट्याला आलेलं काम युद्ध करणं हे होतं. ते सोडून स्वत:चं डोकं लढवून युद्ध करणं अयोग्य आहे असं त्यानं ठरवलं. त्यावर भगवंतांनी त्याला गीता सांगितली हे आपल्याला माहीत आहेच. तिची सुरवात करताना भगवंत म्हणाले ज्ञानी असशील तर समजून उमजून गप्प बैस आणि ज्ञानी नसशील तर मी सांगतोय ते ऐक. इथं बाप्पा गणेश गीतेच्या माध्यमातून तेच सांगत आहेत. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की, ईश्वराने दिलेलं काम आपण नि:शंक मनानं करावं कारण त्यात आपले हित असते.

नेमून दिलेलं कर्म करणाऱ्याच्या पाठीशी भगवंत उभे असतात. ते त्याला सर्वतोपरी सहाय्य करतात. त्याच्यावरील संकटं दूर करतात. वेळ आली तर स्वत: पुढे होऊन भक्ताचं रक्षण करतात. माऊली म्हणतात तसं पाईकू पाठीशी घातला। पुढे उभा ठाकला। असा अनुभव अर्जुनाने घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वर साधकाला तो करत असलेल्या कर्माच्या बंधनातून मुक्त करतात आणि अंतिमत: मुक्ती प्रदान करतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article