Kolhapur Crime : हातकणंगलेत पत्नीला पळवून नेल्यावरून कोयत्याने वार
कृष्णात खोतची प्रकृती गंभीर
हातकणंगले : पत्नीला पळवून नेल्याच्या कारणावरून एकावर तिघां-चौघांनी कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे.हातकणंगले येथील मैत्री चहाच्या समोर घटना घडली आहे. कृष्णांत नामदेव खोत (वय ३६) रा. खोतवाडी असे जखमीचे नाव असून संशयित आरोपींची विकी घोरपडे, प्रकाश एडके आणि अन्य दोघेजणसंशायित आरोपी असून घटनास्थळी कोयता टाकून संशयित फरारी झाले आहेत. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात सुरू होते.
कृष्णात खोत हा विवाहित असून त्याने काही वर्षापूर्वी पत्नीला सोडून दिले आहे. त्यानंतर ही त्याने एका महिले-शी अनैतिक संबंध ठेवले होते. संशयित विकी घोरपडे (रा. तारदाळ, खोतवाडी) याची हातकणंगले येथीलपाच तिकटी येथे पान टपरी आहे. काही दिवसापासून दोघांची मैत्री झाली होती. कृष्णात याने विकीच्या पत्नीलाच फूस लावून पळवून नेले. यातून विकी त्याच्यावर राग धरून होता.
आज सायंकाळी मैत्री हॉटेलवर सर्वजण घेण्यासाठी गेले असता वादावादी झाली. वादाबादी वाढत गेल्याने कृष्णात याने मित्रांना बोलावून घेतले यावेळी त्यापैकी काही जणां-ना फोन आल्याने ते बोलत बाजूला गेले. हीच संधी साधून संशयितांनीकृष्णातबर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेतील कृष्णात याला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयांत दाखल केले.
मात्र त्याची गंभीर प्रकृती पाहून सांगली शासकीय रुग्णालयांत पाठवले. तेथून त्याला सांगलीतील खासगी रुग्णालयात पाठवले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती अधिक गंभीर झाली आहे. याबाबत हातकणंगले पोलिसांना उशीरापर्यंत काहीच माहिती नव्हती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले