कला अकादमीचे सिलिंग कोसळले
वर्गात विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला : दुरुस्तीकामाबाबत साशंकता
प्रतिनिधी/ पणजी
तब्बल 60 कोटी ऊपये खर्च करून दुऊस्त करण्यात आलेल्या कला अकादमीच्या भ्रष्टाचाराचे एकेक सांगाडे कोसळू लागले असून शनिवारी त्यात आणखी एका सांगाड्याची भर पडली आहे. यावरून कला अकादमीला लागलेल्या ‘कोसळण्याच्या’ शापातून अद्याप मुक्तता मिळालेली नाही हेच स्पष्ट झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार अकादमीतील पश्चिमी संगीत वादन वर्गाचे सिलिंग काल शनिवारी दुपारच्यावेळी अचानक कोसळून पडले. सुदैवाने त्यावेळी विद्यार्थी वर्गात आलेले नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाहीत. या घटनेमुळे आता या इमारतीच्या दुऊस्तीकामावरून पुन्हा एकदा लोकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे गत दोन वर्षांपासून कला अकादमीला कोसळण्याची सवय लागली आहे. यातील सर्वात मोठी घटना म्हणजे (दि. 17 जुलै 2024 रोजी) या संस्थेचा कोसळून पडलेला खुला रंगमंच अद्याप दुऊस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे ‘कला राखण मांड’ या संस्थेच्या झेंड्याखाली राज्यभरातील कलाकारांनी तब्बल दोन वर्षे अभिनव पद्धतीने आंदोलन करून व पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली होती. तरीही सरकारचे डोळे तर उघडलेलेच नाहीत, उलटपक्षी कला अकादमी स्वत:च त्यात भर घालून सरकारला वाकुल्या दाखवत आहे, अशी टीका होऊ लागली आहे.