महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खटले दाखल करून झाला कोट्याधीश

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2600 जणांच्या विरोधात दाखल केले खटले

Advertisement

जगात काही लोक अजब मार्गाने पैसे कमावत असतात. पैशांसाठी फसवणूक केल्यास कायदेशीर कारवाईची भीती असते. परंतु एका इसमाने पैशांसाठी शत्रुत्व पत्करण्याची सीमाच गाठली आहे. त्याने कायद्यालाच स्वत:च्या कमाईचा स्रोत करून सोडले आहे. अमेरिकेतील हा व्यक्ती कित्येक वर्षांपासून लोकांच्या विरोधात खटले दाखल करून पैसे कमावत आहे. या इसमाने आतापर्यंत 2600 खटले दाखल केले आहेत  आणि यातील अनेक खटले जिंकून भरपाईदाखल कोट्यावधी रुपये कमाविले आहेत.

Advertisement

 आईविरोधातही खटला

सर्वप्रथम त्याने स्वत:च्या आईवर खराब पालनपोषणाचा आरोप करत खटला दाखल केला होता. या खटल्यात त्याने स्वत:ला झालेल्या त्रासावरून भरपाईची मागणी केली होती. या भरपाईच्या रकमेतून तो आता श्रीमंत झाला आहे. परंतु सर्वकाही कायदेशीर मार्गाने केले जात असल्याने तो अडचणीत आलेला नाही. परंतु जोनाथन नाव असलेल्या या व्यक्तीला विकिपीडियाकडून जगातील सर्वात मोठा फ्रॉडस्टर म्हटले जाते.  अनेक लोकांवर खटले दाखल केल्याने त्याच्या नावावर विश्वविक्रम देखील नोंदविला गेला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार त्याचे नाव जगात सर्वाधिक खटले दाखल करणारा व्यक्ती म्हणून नोंद झाले आहे. या विक्रमानंतर त्याने गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड्सवरही खटला भरला आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे जेव्हा एखादा न्यायाधीश त्याच्याविरोधात निर्णय देत असल्यास तो संबंधित न्यायाधीशाच्या विरोधातच खटला दाखल करत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article