For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडसइंड’सह 6 बँकांमधील हिस्सेदारी एचडीएफसी करणार खरेदी

06:10 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इंडसइंड’सह 6 बँकांमधील हिस्सेदारी एचडीएफसी करणार खरेदी
Advertisement

9.50 टक्के स्टेक खरेदी होणार : आरबीआयकडून हिरवा कंदील : वर्षात खरेदी करावी लागणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंडसइंड बँकेसह 6 बँकांमधील 9.50 टक्केपर्यंत हिस्सा खरेदी करण्यास भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एचडीएफसी समूहाला मान्यता दिली आहे. या 6 बँकांच्या नावांमध्ये आयसीआयसीआय बँक, बंधन बँक, अॅक्सिस बँक, येस बँक आणि सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.

Advertisement

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, एचडीएफसी समूहाने या खरेदीसाठी आरबीआयकडे मंजुरी मागितली होती, त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी आरबीआयने या खरेदीसाठी परवानगी दिली होती. यासोबतच सेंट्रल बँकेने म्हटले आहे की, या बँकांमध्ये खरेदी केलेला हिस्सा 9.50 टक्के पेक्षा जास्त नसावा असेही स्पष्ट केले आहे.

भागभांडवल 1 वर्षाच्या आत खरेदी करावे लागणार आहे. आरबीआयच्या मंजुरीनंतर, आता एचडीएफसी समूहाला या बँकांमधील आपली भागीदारी एका वर्षात म्हणजे 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत 9.50 टक्केपर्यंत वाढवावी लागेल.

एचडीएफसी समूह आपली कंपनी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी म्युच्युअल फंड, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, एचडीएफसी अॅग्रो आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स यांच्यामार्फत या बँकांमधील भागभांडवल खरेदी करेल. वर्षभरात खरेदी न केल्यास आरबीआयची मान्यता रद्द होईल आणि पुन्हा परवानगी घ्यावी लागेल.

आरबीआयच्या मंजुरीनंतर येस बँकेचे शेअर्स वाढले एचडीएफसी ग्रुपच्या या बँकांच्या खरेदीसाठी आरबीआयच्या मंजुरीनंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये 10 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्याचा शेअर 23 रुपयांवर उघडला, जो सध्या 25 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

Advertisement
Tags :

.