महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टी-20 मालिकेतून हॅजलवूड बाहेर

06:23 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / मेलबोर्न

Advertisement

ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हॅजलवूड दुखापतीमुळे सहभागी होवू शकणार नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली.

Advertisement

गेल्या आठवड्यात नेटमध्ये सराव करत असताना 33 वर्षीय हॅजलवूडला किरकोळ स्नायु दुखापत झाली होती. 11 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याला प्रारंभ होत आहे. हॅजलवूड या मालिकेत उपलब्ध राहणार नसल्याने त्याच्या जागी रिले मेर्डिथचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन तब्बल तीन वर्षांनी होत आहे. मेर्डिथने यापूर्वी म्हणजे 2021 साली विंडीज विरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी पॅट कमिन्स या दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मिचेल स्टार्कचा समावेश करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आणखीन एक वेगवान गोलंदाज जॉन्सन दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. या मालिकेत आता मेर्डिथ, बार्टलेट, अॅबॉट, इलिस यांच्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची मदार राहिल. कॅमेरुन ग्रीन, हार्डी, स्टोईनीस, मिचेल मार्श, अनुभवी झंपा व नवोदित कोनोली हे प्रमुख खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला एडीनबर्ग येथे 4 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. मिचेल मार्शकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ

मिचेल मार्श (कर्णधार), अॅबॉट, बार्टलेट, कोनोली, टीम डेव्हिड, इलीस, मॅकगर्क, ग्रीन, हार्डी, हेड, इंग्लिस, मेर्डिथ, स्टोईनीस व झंपा.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article