अफगाणिस्तानातील हॉन्टेड मिलिट्री आउटपोस्ट
अफगाणिस्तान या देशाचा इतिहास अनोखा राहिला आहे. येथे ज्या कुणी साम्राज्याने स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते नष्ट झाले आहे. याचमुळे अफगाणिस्तानाला ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर्स म्हटले जाते. 1979 ते 1989 या काळातील सत्तासंघर्षादरम्यान येथे सुमारे 10 हजारांहून अधिक सोव्हियत सैनिक मारले गेले होते. 2001-21 दरम्यान अनेक अमेरिकन सैनिकांनीही अफगाणिस्तानात स्वत:चा जीव गमावला.
अफगाणिस्तानात एक अशी हॉन्टेड मिलिट्री आउटपोस्ट असून तेथे आजही अनेक रहस्यमय आवाज ऐकू येतात असे बोलले जाते. या ठिकाणी अनेक पॅरानॉर्मल घटना घडतात, ज्याचा उल्लेख येथे तैनात राहिलेल्या अनेक सैनिकांनी केला होता. अफगाणिस्तानाच्या हेल्मंड प्रांतात भीतीदायक ठिकाणी ही आउटपोस्ट आहे. ऑपरेशन एन्ड्यूरिंग फ्रीडमपूर्वी येथे एक आउटपोस्ट होती, ज्याला द रॉक नावाने ओळखले जात होते. अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानात पाऊल ठेवण्यापूर्वी हे ठिकाण तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात होते.
अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने या पूर्ण ठिकाणाला उदध्वस्त केले होते. या हल्ल्यात अनेक तालिबानी दहशतवादी तेथे जिवंत गाडले गेले होते. परंतु शोधात अनेक हाडंही मिळाली, जी सुमारे 100 वर्षांपेक्षा अधिक जुनी होती. सुरक्षा कारणांमुळे या ठिकाणाचे आतापर्यंत विस्तृत अध्ययन झालेले नाही.
रॉक पूर्वी एक किल्ला होता असे अनेक लोकांचे सांगणे आहे. ऑपरेशन एन्ड्यूरिंग फ्रीडमदरम्यान येथे तैनति अनेक मरीन सैनिक आणि ब्रिटिश सैनिकांनी या ठिकाणी अनेक रहस्यमय घटना घडत असल्याचा दावा केला होता. त्यांना अनेकदा विचित्र स्टेटिक रेडिओचे आवाज ऐकू यायचे. याचबरोबर अनेक रहस्यमय प्रकाशही दिसून येत होते. दाट अंधारात या सैनिकांना रशियन आवाज ऐकू यायचा. कुणी आपल्याला पाहत असल्याची जाणीव अमेरिकेच्या सैनिकांना व्हायची. याचबरोबर सडलेल्या मांसाचा दुर्गंधही यायचा.