भूतांनी झपाटलेले हॉटेल
मुलांचे आत्मे भटकत असल्याचे दावे
जगभरात अनेक लोक भूतांवर विश्वास ठेवत नाहीत. तरीही भूतांशी निगडित किस्से अन् कहाण्या समोर येत असतात. इंग्लंडमधील एका हॉटेलमध्ये अनेक वर्षांपासून मुलांचे आत्मे भटकत असल्याचे दावे केले जात आहेत. या हॉटेलमध्ये भलेभले लोक एक रात्रही घालवू शकले नाहीत. चेस्टर येथील या 400 वर्षे जुन्या हॉटेलचे नाव ओल्ड किंग्स हेड आहे. याला ब्रिटनमधील सर्वात भुताटकीयुक्त हॉटेल संबोधिले जाते. अलिकडेच या हॉटेलशी निगडित एक वेबसीरिज ‘माय हाँटेड हॉटेल’ अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे.
या हॉटेलमध्ये भूत मॉन्क, मुलांचे आवाज आणि आपोआप हलणाऱ्या खूर्च्या दिसून येत असल्याचा दावा करण्यात येतो. यातील काही घटना सीसीटीव्ही फुटेलमध्ये कैद झाल्याचे सांगण्यात येते. चेस्टरच्या लोअर ब्रिज स्ट्रीटवर 1622 मध्ये निर्मित हे ओल्ड किंग्स हेड कधीकाळी वेश्यालय होते, शतकांपासून येथे भुताटकीच्या घटना घडत असल्याचे बोलले जाते, ज्यांना आता ‘माय हाँटेड हॉटेल’ सीरिजमध्ये दाखविण्यात आले आहे.
2012 मध्ये पॅरानॉर्मल घडामोडींचा चाहता हॅरी अचिलियोस यांनी हे हॉटेल खरेदी केली आणि 24/7 कॅमेऱ्यांद्वारे भूतांचा शोध सुरू केला. आता हे माय हाँटेड प्रोजेक्टचा हिस्सा आहे, जो पेनसिल्वेनिया, लिव्हरपूर आणि वेल्समध्ये भुताटकीयुक्त जागांची पडताळणी करतो. सीरिजमध्ये लोक उत्साहात येतात, परंतु भीतीदायक अनुभवानंतर पळून जात असल्याचे सीरिजमध्ये दाखविण्यात आले आहे.
2019 मध्ये कॅमेऱ्यांमध्ये एक भूत मॉन्क कैद झाला, जो एका खिडकीकडे जात अचानक गायब झाला. हॉटेलमध्ये बाहुल्या आपोआप शेल्फमधून खाली पडतात आणि खुर्च्या हलू लागतात. रुमनजीकच एक सिक्रेट वॉयडमध्ये लाकडी डबा मिळाल्याचे डॅनी यांनी सांगितले. ग्रेस नावाची बाहुली ब्रिटनमधील सर्वात भुताटकीयुक्त मानली जाते, ही बाहुली रुम 8 मध्ये काचेच्या शेल्फमध्ये ठेवण्यात आली, जेथे लोक तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ राहू शकले नाहीत. हॉटेमध्ये 16 नाइट व्हिजन कॅमेरे प्रत्येक क्षण रिकॉर्ड करतात.