हासेवाडी एसटी बसने घेतला पेट
कोरेगाव :
वाठार स्टेशन येथून कोरेगावला निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसने हासेवाडी गावात अचानक पेट घेतला. एसटीला आग लागल्यामुळे एकच खबर उडाली यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली. ग्रामस्थांच्या मदतीने एसटी बसची आग विझवण्यात यश आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाठार स्टेशनहुन येथून साडेबारा वाजता वाठार-कोरेगाव ही एसटी महामंडळाची बस (श्प्11-ँथ् 9337) भाडळी मार्गे कोरेगावकडे रवाना झाली. अर्ध्या तासानंतर हासेवाडी गावात येताच एसटी बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या निदर्शनास येताच बसच्या चालकांनी गाडी जागीच उभी केली. तसेच प्रवाशांना खाली उतरवले. यावेळी इंजिनने पेट घेतल्यामुळे ही आग झपाट्याने बसला लागली व आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. यात बस जळून खाक झाली.
यावेळी ग्रामस्थ व प्रवाशांनी तात्काळ प्रसंगावधान राखत आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. हासेवाडी व चिलेवाडी ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व सहकाऱ्यांनी एसटी बसची आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. सुदैवानं यामध्ये असलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले होते. प्रवाशांमध्ये वाठार होऊन भाडळे विभागातील विविध गावात जाणाऱ्या पाडळी भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. यामुळे भागात एकच खळबळ उडाली.
सहा वाजेपर्यंत वाठार पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद झाला नव्हता.