महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला...चक्काजाम 26 ऐवजी 23 नोव्हेंबरला- राजू शेट्टी

06:57 PM Nov 20, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांच्याकडून आपल्याला हवा तसा अहवाल तयार करून घेतला आहे. या गोष्टी अशा घडणार असे माहीत होतं. समितीचा अहवाल देणे हा केवळ फार्स होता. असा असा गंभिर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच चक्काजाम 26 नोव्हेंबर ऐवजी 23 नोव्हेंबर रोजी होणार असून यापुर्वी कारखानदारांनी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण आता कारखानदारांना शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गुडघे टेकायला लावणार असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement

आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेला संबोधित करताना राजू शेट्टी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभिर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी बैठकीत एक समिती बनविण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल मिऴाला पण त्यांच्या आकडेवारीत आणि आमच्या आकडेवारीत फरक आढळत आहे. जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांना जसा अहवाल पाहीजे तसाच बनवला आहे." असा आरोप केला.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले, "18 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 94 हजार टन इतकेच ऊसाचे गाळप झाले आहे. शेतकऱ्यांनी एकप्रकारे अभूतपूर्व एकजूटच दाखवली आहे. आमचा दर जाहीर झाल्याशिवाय आम्हाला तोड नको अशी शेतकऱ्यांची भावना आहे. पण कारखानदारांनी शेतकऱ्यांवर दडपशाहीचा वापर केला. कारखानदारांनी आंदोलन मोडीत काढण्याचे ठरवले होते." असा खुलासा त्यांनी केला.

शेवटी बोलताना ते म्हणाले, "सर्वपक्षीय कारखान्यांनी ठरवले असेल पण आता त्यांना गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही. कारखानदारांनी लवकरात लवकर आपला दर जाहीर केला नाही तर चक्काजाम 26 ऐवजी 23 नोव्हेंबर रोजी होईल. यामध्ये पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग 23 नोव्हेंबर रोजी पुलाची शिरोली येथे रोखून धरणार." असे मत व्यक्त केले.

Advertisement
Tags :
Chakkajam NovemberCollectors Rahul Rekhawarhasan mushrifRaju Shetty
Next Article