VIDEO>>माझं प्रेम पातळ झालं...! ही धर्म- अधर्माची लढाई; मुश्रीफांची ए. वाय. पाटील यांच्याविषयी व्यक्त केल्या भावना
मेहुणे- पाहुण्याच्यांत फिस्कटल्यानंतर बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत ए. वाय. पाटील यांनी के.पी. पाटील यांची छावणी गाठली. ए. वाय. पाटील यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी त्यांची राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनधरणी केली. पण या मनधरणीला मंत्री हसन मुश्रीफ यांना अपयश आले. त्यासंबंधी त्यांनी जाहीर वक्तव्य करून आपल्याला अपयश आल्याचे सांगितले. आणि इथून पुढील लढाई धर्म- अधर्माची असणार असल्याचे सांगितले.
हेही पहा VIDEO>>>मनधरणीला आलेल्या अपयशानंतर मुश्रीफांची ए. वाय. पाटील यांच्याविषयी व्यक्त केल्या भावना
ए. वाय. पाटील हे आबीटकर गटाला जाऊन मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्याविषयी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले "ए. वाय. पाटील यांच्यावर मला विश्वास होता. ते आम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत असे नेहमी वाटत होतं. मात्र, त्यांना आपल्या सोबत ठेवण्यात मला अपयश आलं असून इथे माझा पराभव झाला. त्यांना कोणती गोष्ट जड आहे हे मला सांगता येत नसून माझं प्रेम पातळ झालं." अशा भावनिक साद त्यांनी घातली.
पुढे बोलताना ते म्हणाले, "ही निवडणूक महाभारतातील धर्माची लढाई आहे. लढाईत अर्जुन म्हणून के. पी. पाटील यांच्या हातात धनुष्य दिला आहे. श्रीकृष्ण म्हणून मी आणि आमदार सतेज पाटील हे महाभारत सांगणार आहोत. समोर कोण आहे, हे न बघता धर्म- अधर्माची निवडणूक लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून आमची आघाडी विजय मिळवेल." असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षांपासून बिद्री कारखान्याचा कारभार अत्यंत सुरळीत व पारदर्शक सुरु आहे. सहकारातील राजकारण व राजकारण वेगळे आहे. यावेळी फारकत असलेले विचार एकत्र येत असतात. हीच बिद्रीच्या निवडणुकीत झाले आहे. राज्यात सर्वात जास्त बिद्री सहकारी साखर कारखान्यांना दिला आहे. विरोधकांनी डोळे उघडून कारखान्याचा कारभार पहावा तेही सहमत होतील", असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
बिद्री साखर कारखान्यासाठी निवडणुकीच्या रणनितीची धुरा सतेज पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. या संबंधीचे सूचक विधान करताना त्यांनी सतेज पाटील यांच्यावर बिद्रीच्या विजयाची जबाबदारी सोपवली असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना सतेज पाटील यांनी संकटाच्या काळात सामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे कामं बिद्रीने घेतले आहे. अनेक आव्हाने असताना देखील के. पी. पाटील यांनी हा करखना चांगला चालवला असे म्हटले आहे.