महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

परीक्षांचे पावित्र्य अबाधित राहिले का ?

06:20 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘नीट’संबंधी सर्वोच्च न्यायालयाकडून प्रश्न, एनटीएला उत्तर देण्याचा आदेश

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

परीक्षांचे पावित्र्य अबाधित राहण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत हे पावित्र्य प्रभावित झाल्याचे वाटत आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच राष्ट्रीय चाचणी परीक्षा प्राधिकारणाला या संबंधी भूमिका स्पष्ट करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 2024 च्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने आणि इतर गैरप्रकार घडल्याने परीक्षा पुन्हा एकवार घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

या परीक्षेनंतर कौन्सिलिंग प्रक्रियेचा प्रारंभ झाला आहे. या कौन्सिलिंगला स्थगिती देण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला. तसेच पुढील सुनावणी 8 जुलैला होणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीतील खंडपीठाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्या. अहसानुद्दिन अमानुल्ला यांच्यासमोर याचिकेची प्राथमिक सुनावणी मंगळवारी घेण्यात आली. प्रश्नप्रत्रिका फुटणे हा घटनेच्या 14 व्या अनुच्छेदाचा (समानतेचा अधिकार) भंग असल्याचे प्रतिपादन याचिकेत आहे.

आज आणखी सुनावणी होणार ?

मंगळवारची सुनावणी ही परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी सादर केलेल्या याचिकेवरची होती. आम्ही आणखी एक याचिका सादर केली आहे. ती प्रश्नपत्रिका फुटल्यासंबंधी, तसेच ग्रेस गुण आणि इतर गैरप्रकारांसंबंधी आहे. ही याचिका बुधवारी न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे. बुधवारीच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने स्पष्ट केले गेले. मात्र, या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली तरी, पुढची सुनावणी 23 जुलैलाच एकत्रितपणे होण्याची शक्यता काही विधीतज्ञांनी बोलून दाखविली आहे.

विद्यार्थ्यांची आंदोलने

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या विरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली आहेत. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने केंद्रीय शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ओखला येथील एनटीएच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. नीट परीक्षेतील घोटाळ्यांची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. एनटीएकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा आणि चाचण्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाय केले जावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

प्रकरण काय आहे ?

2024 च्या नीट-युजी परीक्षेचा परिणाम 5 जूनला घोषित करण्यात आला होता. यावेळी तब्बल 67 विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व, अर्थात 720 गुण मिळाल्याचे घोषित करण्यात आले. आतापर्यंत कधीच इतक्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले नव्हते. या 67 प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी हरियाणातील एका केंद्राचे होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याही यावेळी मागच्या वेळेपेक्षा 2 लाखांनी जास्त होती. फिजिक्स या विषयाची प्रश्नप्रत्रिका फुटल्याचे आरोप झाले होते. तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

न्यायालयाने मागविले उत्तर

ड नीट परीक्षेसंबंधी झालेल्या आरोपांना उत्तर देण्याचा एनटीएला आदेश

ड पुढची सुनावणी 23 जुलैला, कौन्सिलिंगला मात्र स्थगिती देण्यास नकार

ड याचिकाकर्त्यांच्या आणखी एका याचिकेवर आज सुनावणीची शक्यता

ड प्रश्नपत्रिका फुटणे हा घटनेच्या 14 व्या अनुच्छेदाचा भंग : आरोप

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article