महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘अडीच वर्षांपासून झोपलेला की आंधळे झालेलात?’

06:32 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजकोट आगीच्या घटनेवर उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले : राज्य सरकारलाही धरले धारेवर

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

राजकोट टीआरपी गेमझोनमधील आगीच्या घटनेवर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयाने राजकोट महापालिका प्रशासनाला फटकारले. लहान मुलांसह 28 जणांच्या मृत्यूनंतर आता शहरात दोन गेमिंग झोन परवानगीशिवाय सुरू असल्याची माहिती उजेडात आली आहे. असे असतानाही इतके दिवस तुम्ही आंधळे झाला होता की झोपी गेला होता? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. उच्च न्यायालयाने आगीच्या भडक्याची गंभीर दखल घेत विशेष न्यायाधीश बिरेन वैष्णव आणि देवेन देसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी स्वत:हून सुरू केली आहे. तसेच राज्य सरकार आणि सर्व महापालिकांना नोटीस बजावली आहे. राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी भीषण आग लागल्यानंतर त्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता.

गुजरात उच्च न्यायालयाने 26 मे रोजी राजकोट टीआरपी गेम झोन घटनेवर कारवाई करून सुनावणी सुरू केली होती. त्यानंतर सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने खडे बोल सुनावत राज्य सरकारच्या कृतीवर प्रश्न उपस्थित करताना आता आमचा स्थानिक यंत्रणा आणि राज्य सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असे वक्तव्यही केले. याप्रकरणी राजकोट महापालिका आणि राजकोट पोलीस आयुक्तांना 3 जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही आयुक्तांना निलंबित करू शकतो पण त्यांना उत्तर देण्याची संधी देत आहोत. आगीच्या घटनांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन का केले जात नाही? असा प्रश्न करत हा न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे. आमच्या आदेशाला चार वर्षे उलटूनही अग्निसुरक्षेबाबत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. अधिकाऱ्यांनी तपासणी न केल्याने गेमिंग झोन सुरूच राहिला आणि निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही मानवनिर्मित घटना असून, निष्पाप मुलांसह लोकांचे नाहक बळी गेले, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.

गेमिंग झोनमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची छायाचित्रे व्हायरल झाल्यासंदर्भातही न्यायालयाने विचारणा केली. जे अधिकारी खेळायला गेले होते ते तिथे काय करत होते? अपघातानंतर पॅनिक बटण दाबण्यात काय अर्थ आहे, आता सरकारने सर्व गेमिंग झोन बंद केले आहेत. पण, योग्य वेळी संबंधित यंत्रणेने सावधगिरी घेतली असती तर अशी घटनाच घडली नसती, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

राजकोट गेम झोन विनापरवाना सुरू

राजकोटच्या cमध्ये 25 मे रोजी संध्याकाळी झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये गेम झोनच्या एका भागात संध्याकाळी 5.33 वाजता वेल्डिंगचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. यातून निघणारी ठिणगी पडल्यामुळे अल्पावधीतच भडकली. कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना गेम झोनमध्ये जाण्यासाठी आणि जाण्याचा एकच मार्ग होता. अवघ्या 2 मिनिटांत आगीने भीषण रूप धारण केल्यामुळे संपूर्ण गेम झोन आगीने वेढला. अग्निशमन दलाच्या 8 पथकांना सुमारे 3 तासांच्या अथक परिश्र्रमानंतर आग विझवण्यात यश आले. 25 हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली. या अपघातात 12 मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गेम झोनचे मालक युवराज सिंग सोलंकी, भागीदार प्रकाश जैन, राहुल राठोड आणि व्यवस्थापक नितीन जैन यांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media fruad viral post
Next Article