महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाला विजेतेपद

06:26 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

70 वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : भारतीय रेल्वे संघ उपजेता : महाराष्ट्राचा संघ उपांत्य फेरीतच गारद

Advertisement

प्रतिनिधी/ अहमदनगर

Advertisement

हरियाणाने 70 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेचा कडवा प्रतिकार 35-30 असा मोडून काढत विजेतेपद मिळविले. दरभंगा, बिहार येथे झालेल्या 51 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाने बँक स्पोर्टस् बोर्डला नमवित पहिल्यांदा विजेतेपद मिळविले होते. नंतर त्यांना मुंबईत (2012) रेल्वेकडून, पटणा - बिहार येथे (2014) राजस्थानकडून, तर जोधपूर, राजस्थान येथे (2016-17) सेनादल कडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर 2022 साली यजमानपद लाभलेल्या 69 व्या राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणाला उपांत्य फेरीत महाराष्ट्राकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय रेल्वे या अगोदर सलग 4 वेळा विजेते होते.

अहमदनगर, वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर झालेला अंतिम सामना पहाण्याकरीता नगरकरांनी तुफान गर्दी केली होती. पंकज मोहितेने आपल्या पहिल्याच चढाईत गुण घेत रेल्वेचे खाते उघडले. पण 10 व्या मिनिटाला 9-6 अशी आघाडी हरियाणाकडे होती. 12 व्या मिनिटाला 9-9, तर 15 व्या मिनिटाला 11-11 अशी पुन्हा बरोबरी झाली. 18 व्या मिनिटाला पंकजने हरियाणाचे शिलकी 2 गडी टिपत हरियाणावर पहिला लोण देत रेल्वेला 17-13 असे आघाडीवर नेले. सामना विश्रांतीला थांबला तेव्हा 18-15 अशी रेल्वेकडे आघाडी होती. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा रेल्वेकडे 27-24 अशी आघाडी होती. शेवटची 1-2 मिनिटे असताना हरियाणाच्या आशू मलिकने शिलकी 2 गडी टिपत रेल्वेवर लोण देत 31-30 अशी आघाडी घेतली. शेवटी 5 गुणांनी 70 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कब•ाr स्पर्धेचा चांदीचा चषक उंचविला.

हरियाणाच्या या विजयात आशू मलिकने 1 बोनस व 12 गुण असे 13 गुण घेत महत्वाची भूमिका बजावली. मोहित गोयतने 2 गुण, 2 पकडीचे आणि एक अव्वल पकड करीत 2 गुण असे 6गुण घेत त्याला योग्य साथ दिली. क्रिशनने 4, तर जयदीपने 2 पकडी करीत बचावाची बाजू उत्तम सांभाळली. भारतीय रेल्वेकडून पंकज मोहीतेने 1 बोनस व 6 गुण असे 7 गुण मिळविले. एम. सुधाकरने 5 गुण घेत त्याला छान साथ दिली. सूरेंदर गिल, नितेश कुमार, परवेज भैस्वावाल यांनी प्रत्येकी 3-3 पकडीत गुण घेतले. तरी देखील रेल्वेला पाचव्यांदा जेतेपद राखण्यात अपयश आले.

चंदीगडला पहिल्यांदाच उपांत्य फेरीत घेऊन जाणाऱ्या पवन शेरावतची उणीव रेल्वेला भासली असेल. स्पर्धेचे बक्षीस वितरण हॉकीचे आंतर राष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले, शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत पार पडले. हरियाणाने अंतिम विजेतेपद मिळविल्याने महाराष्ट्राच्या खेळाडूंना व क्रीडा रसिकांना कुठे ना कुठे तरी चुटपुट लागून राहिली असेल. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राला 38-37 असे, तर भारतीय रेल्वेने चंदीगडला 5-5 चढायांच्या डावात 43-41 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. बाद फेरीपासूनचे सर्वच सामने चुरशीने खेळले गेले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article