कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वात हरियाणा स्टीलर्स विजेते

06:43 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाटणा पायरेट्स संघावर 32-23 अशी मात : शाडलुईचा जबरदस्त बचाव 

Advertisement

प्रतिनिधी/ पुणे

Advertisement

प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वात हरियाणा स्टिलर्सने विजेतेपदाला गवसणी घातली. बचावपटू महंमद रेझा शाडलुईचा भक्कम बचावापुढे पाटणा पायरेटसचे आव्हान 32-23 असे सहज परतवून लावले. हरियाणाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.

संपूर्ण सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या बचावफळीने पाटणा पायरेट्सच्या चढाईपटूंची कसोटी पाहिली. देवांक आणि अयान या चढाईपटूंवर पाटणा अवलंबून होते. पण, आज त्यांचे दोन्ही शिलेदार हरियाणाचा बचाव भेदू शकले नाहीत आणि बचावफळी शिवम, विनयला रोखू शकले नाहीत. सामना एकवेळ एकदोन गुणांच्या फरकाने सुरु होता. मात्र, सामना संपण्यास सात मिनिटे असताना हरियाणा संघाने चढवलेला लोण सामन्याचा निकाल ठरविण्यास पुरा ठरला. या लोणनंतर हरियाणा संघाने पूर्ण वर्चस्व राखत विजेतेपद निसटणार नाही याची काळजी घेतली. शाडलुईने बचावात मिळविलेले 7 गुण लीगच्या इतिहासात अंतिम फेरीतील सर्वाधिक ठरले. चढाईत शिवमने 9 आणि विनयने 7 गुण मिळवून आपली जबाबदारी चोख बजावली. तुलनेत पाटणाकडून गुरदीपच्या हायफाईव्ह खेरीज सांगण्यासारखे काहीच घडले नाही. सर्वाधिक चढाईचे गुण मिळविणाऱ्या देवांकने एका हंगामातील गुणांचे त्रिशतक गाठले. मात्र, त्याला पाच गुणांच्या पुढे जाता आले नाही. अयानही केवळ 3 गुण मिळवू शकला. येथेच पाटणाचे अपयश स्पष्ट होते.

स्पर्धेतील विजेत्या हरियाना स्टिलर्स संघाला करंडक व 3 कोटी रुपये तर, उपविजेत्या पाटणा पायरेट्स संघाला करंडक व 1.8 कोटी रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रो कब•ाr लीग कमिशनर अनुपम गोस्वामी, आयकेएफचे अध्यक्ष विनोद तिवारी आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नवदिप सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

इतर पारितोषिके:

रेड ऑफ द सीजन 11 : मनजीत (तेलुगु टायटन्स)

टॅकल ऑफ सीझन 11 : अंकित (पाटणा पायरेट्स)

सीझन 11 चा सर्वोत्कृष्ट रेडर : देवांक दलाल (पाटणा पायरेट्स)

सीझन 11 चा सर्वोत्कृष्ट डिफेंडर : नितेश कुमार (तमिळ थलैवाज)

मशाल स्पोर्ट्स सिझन 11 चा युवा खेळाडू : अयान लोहचब (पाटणा पायरेट्स)

मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू : मोहम्मदरेझा शादलुई (हरियाणा स्टीलर्स)

मदर डेअरी सुपर कोच : मनप्रीत सिंग (हरियाणा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article