महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणा स्टीलर्सचा सलग चौथा विजय

05:57 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुजरात जायंट्सवर 31-29 गुणांनी मात

Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

हरियाणा स्टीलर्सने अष्टपैलू खेळाचे चमकदार प्रदर्शन करीत प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात गुजरात टायटन्सवर 31-29 असा विजय मिळविला.

पीकेएलच्या दहाव्या मोसमात सलग चार विजय नोंदवणारा हरियाणा स्टीलर्सहा पहिला संघ बनला आहे. स्टीलर्सने प्रारंभी 5-1 अशी झटपट आघाडी घेतली. पण जायंट्सच्या फाझेल अत्राचलीचे सुपर टॅकल व रोहित गुलियाने चढाईत हुशारीने केलेल्या टो टचवर मुसंडी मारली. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ झाला. पण मोहित नंदलने प्रतीक दाहियाला बाद करीत हाय 5 मिळवून स्टीलर्सला मोठी आघाडी मिळवून दिली आणि 19 व्या मिनिटाला विनयने ऑलआऊट करीत जायंट्सच्या अडचणीत भरच टाकली. मध्यांतराला स्टीलर्सने 17-10 अशी आघाडी मिळविली होती.

पूर्वार्धात जायंट्सला केवळ पाच रेड पॉईंट्स मिळविता आले तर स्टीलर्सचा राईट कव्हर मोहितने एकट्यानेच पाच टॅकल पॉईंट मिळविले. मध्यांतराला जायंट्सचे प्रशिक्षक राम मेहरनी प्रेरित केल्यानंतर उत्तरार्धात त्यांच्या खेळात फरक पडल्याचे दिसून आले. रोहितने अप्रतिम सुपर रेड करीत स्टीलर्सची आघाडी 15-19 अशी कमी केली आणि मोहम्मद नबिबक्षने सुपर टॅकल करीत स्टीलर्सना ऑलआऊट करीत त्यांच्या जवळ मजल मारून दिली.

उत्तरार्धातील पहिल्या दहा मिनिटात जायंट्सने 10 गुण मिळविले तर स्टीलर्सला फक्त तीनच गुणांची कमाई करता आली. सोनू जगलानने बेंचवरून मैदानात उतरल्यानंतर जबरदस्त बॅककिक मारत जायंट्सला सात मिनिटांचा खेळ बाकी असताना 23-24 अशी बरोबरी साधून दिली. सामना कोणीही जिंकू शकतो, अशी स्थिती असताना स्टीलर्सने दबावाची परिस्थिती व्यवस्थित हाताळत सरस कामगिरी करून दोन गुणांनी विजय साकार केला. सामना संपण्यास 60 सेकंद बाकी असताना आशिषने सोनूची यशस्वी पकड केली तर विनयने चढाईमध्ये दोन गुण घेत स्टीलर्सची अपराजित घोडदौड कायम राखली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article