महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणा, ओडिशा, तामिळनाडू विजयी

06:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जालंधर (पंजाप) : 2024 च्या हॉकी हंगामातील येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या 14 व्या कनिष्ट पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेत गुरुवारी हरियाणा, ओदिशा, तामिळनाडू आणि दिल्ली यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. त्याच प्रमाणे दादरा नगर-हावेली, कर्नाटक, दिल्ली यांनीही विजय नोंदविले.

Advertisement

स्पर्धेतील गुरूवारी तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात हरियाणाने जम्मू काश्मिरचा 14-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. हरियाणातर्फे नितीनने 3 तर अमित खासा, मनीषकुमार, रवी आणि नवराज सिंग यांनी प्रत्येकी 2, कर्णधार पांचाल, सुनिल मान, साहिल यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात ओदिशाने आसामचा 13 गोलांनी दणदणीत पराभव केला. ओदिशातर्फे सतीश मुंडाने 4 गोल तर देवनाथने 3 गोल केले. दीपक प्रधानने तसेच प्रताप टोप्पोने प्रत्येकी 2 गोल नेंदविले. ओदिशातर्फे करण लाक्रा व प्रदीप मंडल यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.

Advertisement

कर्नाटकाने आंध्रप्रदेशचा 6-1 असा फडशा पाडला. कर्नाटकातर्फे गौरव गणपती, डी. आर. पवन, पवन जाधव, आर्यन उत्तप्पा, विवेक बागडे, कर्णधार पी. सुनील यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. अन्य एका सामन्यात दिल्लीने केरळचा 4-3 अशा गोल फरकाने निसटता विजय केला. तामिळनाडूने गुजरातवर 10-2 अशी मात केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article