महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणातील काँग्रेस आमदाराला अटक

07:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : बेकायदा खाण उपसा करण्याच्या उद्योगातून मिळालेल्या अवैध पैशाचे लाँड्रिंग केल्याप्रकरणी प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंदर पनवर यांना अटक केली आहे. या आमदाराच्या घरावर जानेवारीत धाड टाकली होती. या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे आमदार दिलबाग सिंग व त्यांच्या एका सहकाऱ्यालाही अटक केले आहे. या संशयितांनी दगड, वाळू व खडी यांचा खाणींमधून बेकायदा उपसा केल्याचा आरोप ठेवला असून या संदर्भात हरियाणा पोलिसांनी अनेक एफआयआर सादर केले आहेत. ई-रवना योजनेतील घोटाळ्यासंदर्भातही ईडी चौकशी करीत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article