जॉन अब्राहमच्या चित्रपटात हर्षवर्धन
अभिनेता जॉन अब्राहम याच्या कारकीर्दीतील फोर्स ही सर्वात यशस्वी चित्रपट फ्रेंचाइज आहे. 2011 मध्ये फोर्स चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर त्याचे दोन भाग प्रदर्शित झाले असून दोन्ही यशस्वी ठरले होते. आता फोर्स 3 चित्रपटाचे काम हाती घेण्यात आले असून यात हर्षवर्धन राणेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. जॉन अब्राहमच्या फोर्स 3 चित्रपटात हर्षवर्धनची एंट्री झाली आहे. आता त्याला याच्या चित्रिकरणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. हर्षवर्धनने या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल जॉनचे आभारही मानले आहेत. हर्षवर्धनने यापूर्वी ‘सनम तेरी कसम’ आणि ‘एक दीवाने की दीवानियत’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर यश मिळविले आहे. तर फोर्स 3 चित्रपटाचे दिग्दर्शन भाव धूलिया करणार आहे. धूलिया यांना ‘खाकी-द बिहार चॅप्टर’ या सीरिजसाठी ओळखले जाते. फोर्स 3 हा 2027 साली प्रदर्शित केला जाईल.