कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हर्षद खडीवाले महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक

06:22 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / पुणे

Advertisement

माजी क्रिकेटपटू हर्षद खडीवाले यांची मंगळवारी सुलक्षण कुलकर्णी यांच्या जागी 2025-26 हंगामासाठी महाराष्ट्राच्या पुरुष वरिष्ठ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.

Advertisement

मे 2024 मध्ये कुलकर्णी यांची महाराष्ट्र संघाचे क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु आता त्यांच्या जागी महाराष्ट्राचे माजी सलामीवीर आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज 36 वर्षीय खडीवाले यांना काम पाहिले आहे. कुलकर्णी यांना यापूर्वी 2023-24 हंगामात तामिळनाडूला रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत प्रवेश दिला होता. एलिट ग्रुप अ मध्ये असलेल्या महाराष्ट्राने पहिल्या फेरीत सातपैकी फक्त दोन विजय, तीन पराभव आणि दोन अनिर्णीत सामने जिंकले होते आणि पाचवे स्थान पटकावले होते. पुण्यातील खडीवाले यांनी नोव्हेंबर 2006 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान महाराष्ट्रासाठी 80 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 40.16 च्या सरासरीने 5367 धावा केल्या. त्यांनी 38 लिस्ट अ सामने आणि 25 टी-20 देखील खेळले.

महाराष्ट्राच्या काही सध्याच्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याचा आणि भूतकाळात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव, ज्यामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीगचा समावेश आहे. ही त्यांची नियुक्ती करण्यामागील कारणे असल्याचे मानले जाते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आगामी देशांतर्गत हंगामासाटॅ इतर नियुक्त्या देखील केल्या आहेत. ज्यामध्ये काही प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे तर काहींना त्यांच्या भूमिकेत कायम ठेवण्यात आले आहे. माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अक्षय दरेकर हे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. ज्यामध्ये किरण आढाव, रोहीत जाधव, सलील अघरकर आणि अमेय श्रीखंडे हे इतर सदस्य आहेत. अमित पाटील हे वरिष्ठ संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षण असतील तर समद फल्लाह हे त्यांचे गोलंदाजी प्रशिक्षक असतील.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharatSocialMedia
Next Article