हर्षाली मल्होत्रा आता दाक्षिणात्य चित्रपटात
दिग्दर्शक कबीर खानचा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’द्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारी मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्रा पुन्हा चर्चेत आली आहे. हर्षाली आता एका नव्या चित्रपटात दिसून येणार असून याची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली आहे. हर्षालीने बजरंगी भाईजान चित्रपटादत स्वतच्या क्यूटनेसद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. बॉलिवूडनंतर आता हर्षाली दाक्षिणात्य चित्रपटात दिसून येणार आहे. आगामी काळात ती दिग्गज अभिनेते नंदमुरि बालकृष्ण यांच्या बहुप्रतीक्षित अखंडा 2 या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी हर्षाली मल्होत्राच्या या चित्रपटातील एंट्रीची पुष्टी केली आहे.
तसेच अखंडा 2 चित्रपटातील हर्षालीचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर शेअर करण्यात आला होता. अखंडा 2 हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या आसपास हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे मानले जातेय.