For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री गोविंद गावडेंवर नाहक टीका

08:03 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्री गोविंद गावडेंवर  नाहक टीका
Advertisement

समर्थक कलाकारांनी व्यक्त केला निषेध

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हेही एक उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांनी सादर केलेल्या नाटकाचे गोवा तसेच इतर राज्यात अनेक प्रयोग झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर तसेच त्यांच्या नाटकावर नाहक टीका करण्यात आली. त्यांचा गोवा कलाकार या बॅनरखाली मंत्री गोविंद गावडे समर्थक कलाकारांनी निषेध व्यक्त केला.

Advertisement

काल शनिवारी येथील साहित्य सेवक मंडळाच्या कार्यालयात मंत्री गोविंद गावडे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत चिदानंद मडकईकर, महेंद्र गावकर, अशोक मांद्रेकर, दिगंबर कोलवाळकर, गणेश गावणेकर व अन्य कलाकार उपस्थित होते. यावेळी चिदानंद मडकईकर म्हणाले की, काही कलाकारांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन कला अकादमीच्या विषयावरून मंत्री गोविंद गावडे यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्यांच्या नाटकातील कामगिरीवरही टीका केली. हे गैर आहे. ते एक उत्कृष्ट कलाकार असून ते त्यांनी नाटकातील अभिनयातून दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. कला अकादमीच्या सद्य स्थितीबाबत संबंधित अधिकारी निर्णय घेतील. जर स्थिती योग्य नसल्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कला अकादमी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतील, असेही ते म्हणाले.

कला अकादमी दुरुस्ती विषयाला बगल

यावेळी उपस्थित पत्रकारांनी जर मुख्यमंत्री कला अकादमीची डागडुजी करणार तर तीन वर्ष कला अकादमी कलाकारांसाठी बंद ठेवून मंत्री गोविंद गावडे यांनी काय केले? कोट्यावधी ऊपये कशावर खर्च केले? कला अकादमीतील साऊंड सिस्टीम, लाईट, पहिल्याच पावसातील गळती याबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी थातुरमातूर उत्तरे देऊन या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. तसेच मंत्री गोविंद गावडेंवर टीका करणाऱ्यांवर तोंडसुख घेऊ लागले. मात्र पत्रकारांनी कला अकादमीचा विषय लावून धरल्याने त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेणे पसंत केले.

Advertisement
Tags :

.