महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताच्या विजयामध्ये हरमनप्रितची हॅट्ट्रीक

06:51 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अँटवर्प (बेल्जियम)

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो-लिग स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंगच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने अर्जेंटिनाचा 5-4 अशा गोल फरकाने पराभव केला.

Advertisement

या सामन्यामध्ये भारतातर्फे कर्णधार हरमनप्रित सिंगने 29 व्या, 50 व्या आणि 52 व्या मिनिटाला असे 3 गोल केले. अर्जितसिंग हुंडालने 7 व्या मिनिटाला आणि गुरुजंत सिंग 18 व्या मिनिटाला गोल नोंदविले. अर्जेटिनातर्फे फेड्रिको मोंजाने तिसऱ्या मिनिटाला, निकोलास किनेनने 24 व्या मिनिटाला, मेरुसीने 54 व्या मिनिटाला आणि लुकास मार्टिनेसने 57 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने अर्जेंटिनावर 3-2 अशी आघाडी मिळविली होती. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना जर्मनीबरोबर 1 जूनला होणार आहे. या सामन्यामध्ये भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्याने त्यांना हा सामना मोठ्या गोलफरकाने जिंकता आला नाही. कर्णधार हरमनप्रित सिंगने एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर नोंदविला. सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांच्या बचावफळीचा कामगिरी भक्कम झाल्याने गोल होऊ शकला नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article