For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिगबॅश स्पर्धेत हरमनप्रित खेळणार

06:01 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिगबॅश स्पर्धेत हरमनप्रित खेळणार
Advertisement

वृत्तसंस्था/मेलबोर्न

Advertisement

ऑस्ट्रेलियात प्रत्येक वर्षी बिगबॅश लीग पुरूष आणि महिलांची क्रिकेट स्पर्धा खेळविली जाते. या दोन्ही स्पर्धांमध्ये फ्रांचायजी अनेक विदेशी क्रिपेटपटूंना करारबद्ध करतात. यावेळी आगामी बिगबॅश लीग स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या पहिल्या यादीमध्ये भारतीय संघाची कर्णधार हरमिनप्रित कौर, इंग्लंडच्या सोफी इक्लेस्टोन आणि हिथेर नाईक यांचा समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडची इक्लेस्टोन ही महिलांच्या वनडे आणि टी-20 गोलंदाजांच्या मानांकनात आघाडीवर आहे. ती या स्पर्धेत सिडनी सिक्सर्स संघाचे प्रतिनिधीत्व करते. ऑस्ट्रेलियाचे त्रिकुट इलेसी पेरी, अॅलिसा हिली आणि गार्डनर यांनाही सिडनी सिक्सर्स संघाकडून यावेळी पुन्हा खेळण्याची संधी मिळत आहे. मेलबोर्न रिनेगेडस् संघाने हरमनप्रित कौरशी करार केला आहे. सुझी बेटस् सिडनी सिक्सर्स संघातील आपले स्थान कायम ठेवेल, असा अंदाज आहे. सदर स्पर्धा डिसेंबर 5 पासून खेळविली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.