हरमनप्रीत सिंग सर्वात महागडा खेळाडू
हॉकी इंडिया लीग लिलाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडिया लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला सर्वाधिक 78 लाख रुपये किंमत मिळाली. सूरमा हॉकी क्लब या फ्रँचायजीने त्याला आपल्या संघासाठी खरेदी केले आहे.
लिलावात सहभागी झालेल्या सर्व आठ फ्रँचायजींनी भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यासाठी भरघोस खर्च केला. अभिषेक हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला श्रची रार्ह बेंगाल टायगर्सने 72 लाख रुपयांना खरेदी केले तर हार्दिक सिंगला यूपी रुद्राजने 70 लाखाला घेतले. पहिल्या लिलावात बऱ्यापैकी मोठी रक्कम मिळविणाऱ्यांत अमित रोहिदासला (48 लाख) तामिळनाडू ड्रॅगन्सने, जुगराज सिंगला (48 लाख) श्रची रार्ह बेंगाल टायगर्सने खरेदी केले. हैदराबाद तुफान्सने आपल्या ताफ्यात सुमितला (46 लाख) सामावून घेतले.
विदेशी गोलरक्षकांमध्ये आयर्लंडच्या डेव्हिड हार्टेला सर्वाधिक बोली मिळाली. तामिळनाडू ड्रॅगन्सने त्याला 32 लाखाला घेतले. जर्मनीचा जीन पॉल डॅनरबर्गला (27 लाख) हैदराबाद तुफान्सने, नेदरलँड्सच्या पर्मिन ब्लाकला (25 लाख) एसआर बेंगाल टायगर्सने, बेल्जियमच्या व्हिन्सेंट वानाशला (23 लाख) सूरमा हॉकी क्लबने खरेदी केले. भारतीय गोलरक्षक सूजर करकेरा व पवन यांनी टीम गोनासिका व दिल्ली एसजी पायपर्सने अनुक्रमे 22 व 15 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले. पहिल्या दिवशीच्या पूर्वार्धात लिलाव झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.