कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरमनप्रीत कौर, युवराज सिंगची नावे स्टँड्सना

06:00 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/न्यू चंदीगड (पंजाब)

Advertisement

चंदीगडमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या महाराजा यदवेंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गुरूवारी खेळविला जात आहे. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकत्याच जिंकलेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील क्रिकेटपटूंचा सत्कार केला. या संघाची कर्णधार हरमनप्रित कौर तसेच 2011 साली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील अष्टपैलू युवराज सिंग यांची नावे या नव्या स्टेडियममधील स्टँड्सना देण्यात आली आहेत. विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील कर्णधार हरमनप्रित कौर, हर्लिन देवोल आणि अमनज्योत कौर यांना प्रत्येकी 11 लाख रुपये तर भारतीय महिला संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीष बाली यांना 5 लाख रुपयांचे बक्षीस पंजाब शासनातर्फे देण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article