For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरमल किनारी भागात लाकडी ओंडके, खुंट धोकादायक स्थितीत

01:22 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरमल किनारी भागात लाकडी ओंडके  खुंट धोकादायक स्थितीत
Advertisement

वार्ताहर /हरमल 

Advertisement

येथील किनारी भागातील पर्यटन हंगाम आटोपला. मात्र काही  शॅक व्यावसायिकांनी उभारलेल्या तंबुंचे लाकडी खुंट तसेच ठेवल्याने पावसाळ्यात पर्यटकांना किनाऱ्यावर  फिरणे धोकादायक बनले आहे. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पर्यटन हंगामात सरकारच्या मान्यतेने शॅक उभारले जातात. तसेच त्यांच्या बेड्स, टेबल्स व अन्य गोष्ठी असतात. कित्येक व्यावसायिक बेड्स ठेवलेल्या ठिकाणी सावलीसाठी लाकडी बांबू पुरून तंबू तयार करतात.मात्र हंगाम आटोपला की लाकडी बांबू न काढता, वरूनच मोडून नेतात, त्यामुळे त्यांचे लाकडी खुंट वाळूत ऊतलेल्या स्थितीत तसेच राहिले आहेत. हे खुंट किनाऱ्यावर फिरणाऱ्या लोंकासाठी धोकादायक आहेत, असे नागरिक प्रणव हरमलकर यांनी  सांगितले.

बांबूचे ’ते’ खुंट पावसाळ्यात धोकादायक 

Advertisement

सदरचे लाकडी खुंट वाळूत असतात,पावसाळ्यात समुद्र लाटांच्या तडाख्याने वाळू बाहेर फेकली जाते व खुंटाचे लाकडी टोके पादचाऱ्यांना टोचण्याची भीती आहे, असे हरमलकर यांनी सांगितले. शॅक्स व्यावसायिक आपला व्यवसाय गुंडाळतात, बांबू वरचेवर अर्धवट तोडून काढतात. मात्र त्याचे खुंट तसेच ठेवतात व किनाऱ्यावर लोकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण करतात. अशांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही व्यावसायिक वाळूत प्लास्टिक बॅरल्स गाडून त्यात सांडपाणी सोडतात. दोन वर्षांपूर्वी असे बॅरल्स दृष्टीच्या टॉवर परिसरात आढळले होते. मात्र गेली दोन वर्षे तशी स्थिती उद्भवली नाही, परंतु खात्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक धोरण राबवले पाहिजे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले. तरी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी शॅक वाटपावेळी जशी पाहणी करू जागा निश्चित केली जाते, तसे पर्यटन हंगाम आटोपल्यानंतर त्या जागांचे पुन्हा सर्वेक्षण करावे, मागणी स्थानिकांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.