हरेंद्र सिंग यांचा राजीनामा
06:22 AM Dec 02, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
Advertisement
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. काही वैयक्तिक समस्येमुळे आपण हे पद सोडत असल्याचे हरेंद्र सिंग यांनी हॉकी इंडियाला कळविले आहे.
Advertisement
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपद आता रिक्त झाल्याने त्याजागी हॉलंडचे जॉर्ड मारीजेनी यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकीत चौथे स्थान मिळविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे मारीजेनी प्रमुख प्रशिक्षक होते. हरेंद्र सिंग यांनी यापूर्वी अमेरिकेच्या पुरूष हॉकी संघाला मार्गदर्शन केले आहे.
Advertisement
Next Article