हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये
अखेरच्या क्षणी नाट्यामय घडामोडीनंतर हार्दिकची मुंबईत घरवापसी
वृत्तसंस्था/ मुंबई
बहुचर्चित अशी आयपीएलमधील डील अखेर झाली आहे. होय नाही असे करत स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या अखेर गुजरातमधून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाच्या बातम्यांना पूर्णविराम आज सायंकाळी सहाच्या सुमारास दिला होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांमध्ये हार्दिक मुंबईत परतल्याचे निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी उशिरा ही सूत्रे हलली आहेत. याशिवाय, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज व आरसीबीने अनेक खेळाडूंना नारळ दिला आहे.
आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सर्व फ्रांचायझींनी रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. एका संघात किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. त्यात 8 परदेशी खेळाडूंचा समावेश असणेही आवश्यक आहे. मात्र, प्लेइंग 11 मध्ये केवळ 4 खेळाडूंनाच संधी दिली जाऊ शकते.
दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर हार्दिक मुंबईत दाखल
हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील होणे हा आयपीएल 2024 पूर्वी मोठा फेरबदल आहे. आयपीएल ट्रेडमध्ये अनेकदा खेळाडूंची अदलाबदल होते. गुजरात टायटन्सने या डीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून हार्दिकच्या बदल्यात एकही खेळाडू घेतलेला नाही. या डीलमध्ये मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांचा सहभाग होता. मुंबई इंडियन्स ही हार्दिक पंड्याची जुनी आयपीएल फ्रँचायझी आहे, ज्याद्वारे त्याने या स्पर्धेत पदार्पण केले होते. पण 2022 मध्ये, नव्याने आलेल्या गुजरात टायटन्सने त्याला त्यांच्या संघाचा भाग बनवले. हार्दिकने गुजरातसाठी यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध केले आहे.
यंदाच्या हंगामात अनेक नामांकित खेळाडूंना नारळ
मुंबईने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला रिलीज केले आहे. सातत्याने दुखापतीचा सामना करत असलेला आर्चर दुखापतीमुळे वर्ल्डकप खेळू शकला नाही. अखेर मुंबईने आर्चरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्चरसह मुंबईने ट्रिस्टन स्टब्स, झाय रिचर्डसन, ख्रिस जॉर्डन यांनाही निरोप दिला आहे. आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेडसाठी औपचारिक मान्यता देण्यात आली आहे, ज्यामध्ये केवळ रोख व्यवहारांचा समावेश आहे, जरी ट्रेड मूल्याचे तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. 30 वर्षीय अष्टपैलू हार्दिक पंड्याची वर्षासाठी लीग फी 15 कोटी रुपये आहे. यामुळे हार्दिकला किती रक्कम मिळते, याकडे लक्ष असणार आहे.
आयपीएल 2024 साठी खेळाडू रिटेन करण्याच्या अखेरच्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने 18 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील या संघाने अनेक मोठ्या परदेशी खेळाडूंना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली सलग सतराव्या हंगामात एकाच संघाचे प्रतिनिधित्व करेल.
याशिवाय, पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सीएसके संघ व्यवस्थापनाने 26 पैकी 8 खेळाडूंना करारमुक्त केले. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार एमएस धोनी हा आणखी एक हंगाम खेळणार असल्याचे नक्की झाले आहे. आयपीएल लिलावात त्यांच्याकडे 32.10 कोटी रुपये शिल्लक असतील. या अखेरच्या दिवशी दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. नवीन मेंटर म्हणून संघात सामील झालेल्या गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली या संघाने तब्बल बारा खेळाडूंना करारमुक्त केले. विशेष म्हणजे संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू असलेले आंद्रे रसेल व सुनील नरेन हे पुन्हा एकदा संघाचा भाग असतील.
सनरायझर्स हैदराबाद संघाने स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकला रिलीज केले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने अनेक खेळाडूंना अलविदा केला आहे. यामध्ये सर्फराझ खान आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे. लखनौ संघाने जयदेव उनाडकट आणि डॅनियल सॅम्स या अनुभवी खेळाडूंना नारळ दिला आहे.
सीएसकेने कायम केलेले खेळाडू- महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शाईक रशीद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राजवर्धन हंगरगेकर, दीपक चहर, महेश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथीशा पथिराणा
करारमुक्त केलेले खेळाडू - बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, के. भगत वर्मा, सुभ्रांशू सेनापती, आकाश सिंग, कायले जेमिसन, सिसांदा मगाला.
राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेले खेळाडू : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरन हेतमायर, डोनोमन फरेरा, ट्रेंट बोल्ट, अॅडम झॅम्पा, रियान पराग, ध्रुव जुरेल, कुणाल राठोड, नवदीप सैनी, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, संदिप शर्मा व आवेश खान (ट्रेड).
करारमुक्त केलेले खेळाडू- जो रूट, ओबेद मेकॉय, जेसन होल्डर, कुलदीप यादव, आकाश वशिष्ठ, मुरूगन अश्विन, केसी करिअप्पा व केएम असिफ.
मुंबईने कायम ठेवलेले खेळाडू - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड व रोमारियो शेफर्ड.
मुंबईने करारमुक्त केलेले खेळाडू - कॅमेरून ग्रीन,जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, रायली मेरेडिथ, झाय रिचर्डसन, ख्रिस जॉर्डन, डुआन जेन्सन, अर्शद खान, रमनदिप सिंग, ऋतिक शौकीन, राघव जुयाल, संदीप वॉरियर.
आरसीबीने कायम केलेले खेळाडू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, रिस टोप्ली, विराट कोहली, अनुज रावत, महिपाल लोमरोर, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, मनोज भांडगे, वैशाक विजयकुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, हिमांशू शर्मा, राजन कुमार व मयांक डागर (ट्रेड) कॅमेरून ग्रीन(ट्रेड)
आरसीबीने रिलीज केलेले खेळाडू : वनिंदू हसरंगा, जोश हेजलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, वेन पार्नेल, डेव्हिड विली, हर्षल पटेल, केदार जाधव, सोनू यादव, अविनाश सिंग व सिद्धार्थ कौल.
गुजरात टायटन्सचा सध्याचा संघ : शुभमन गिल, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृध्दिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद ली शमी, शमी. , आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान.
गुजरातने करारमुक्त केलेले खेळाडू - यश दयाल, केएस भरत, शिवम मावी,
उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासून शनाका.
हैदराबादने कायम ठेवलेले खेळाडू - एडन मार्करम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रे•ाr, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद, मार्को येनेसन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, वॉशिंग्टन सुंदर. कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, मयांक मार्कंडे, फजलहक फारुकी.
हैदराबादने करारमुक्त केलेले खेळाडू - हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील हुसैन, आदिल रशीद.
कोलकाता नाईट रायडर्सचा सध्याचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, डेव्हिड विज, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.
केकेआरने करारमुक्त केलेले खेळाडू - उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी, लिटन दास, शाकिब अल हसन, डेव्हिड विसे,एन जगदिशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर व जॉन्सन चार्ल्स.
दिल्ली कॅपिटल्सचा सध्याचा संघ - ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, लुंगी एनगिडी, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे.
दिल्लीने करारमुक्त केलेले खेळाडू - रिले रुसो, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग.