महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टी-20 अष्टपैलूंमध्ये हार्दिक पंड्या पुन्हा अग्रस्थानी

06:45 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याने टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अग्रस्थान पटकावले आहे तर तिलक वर्माने मोठी झेप घेत फलंदाजांच्या  क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली.

Advertisement

हार्दिकने अष्टपैलूंच्या क्रमवारीत इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन व नेपाळचा दीपेंद्र सिंग आयरी यांना मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अलीकडेच झालेल्या टी-20 मालिकेतील शानदार कामगिरीचा त्याला क्रमवारीत बढती मिळण्यास लाभ झाला आहे. भारताने ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. हार्दिकने दुसऱ्यांदा या क्रमवारीत अग्रस्थान मिळविले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकावीराचा पुरस्कार मिळविणारा तिलक वर्मा यानेही एकदम 69 स्थानांची मोठी झेप घेतली असून तो आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दोन शतकांसह 280 धावा जमविल्याचा त्याला फायदा झाला आहे. फलंदाजांमध्ये ट्रॅव्हिस हेड व इंग्लंडचा फिल सॉल्ट पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article