महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यपालांकडून गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

04:52 PM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. गणेश चतुर्थी हा आपल्या देशातील एक महत्त्वाचा सण असून धर्म, जात, पात बाजूला सारून सर्व नागरिक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. श्री गणेश हे हिंदू देवतातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक असून त्याना विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. श्रीगणेश ‘विघ्नहर्ता’ म्हणजे सर्व अडचणी दूर करणारा आणि यश आणि समृध्दीचे दैवत आहे, असे राज्यपाल संदेशात म्हणतात ,गणेश चतुर्थीचा उत्सव संपूर्ण देशभरात आनंदाची उधळण करतो आणि सामाजिक सलोखा आणि परस्पर सामंजस्याने लोकांना एकत्र आणतो. या शुभ प्रसंगी, भगवान गणेश सर्वांना शांतता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात म्हणतात.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article