छतावर मातीने रेखाटले हनुमान
कलाकाराचे सोशल मीडियावर होतेय कौतुक
सोशल मीडिया लोकांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत चांगले व्यासपीठ आहे. लोक स्वतःच्या कलेला जगासमोर आणण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत असतात. अशाच एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीची कला पाहून त्याचे कौतुक केले जात आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
मातीने साकारले चित्र
या व्हिडिओत एका व्यक्तीला स्वतःच्या घराच्या छतावर मोठय़ा प्रमाणात माती विखुरताना पाहिले जाऊ शकते. व्हिडिओच्या प्रारंभी हा व्यक्ती नेमका काय करतोय हे समजणे अवघड ठरते. परंतु हळूहळू त्याची कला निखरून समोर येते.
काही मिनिटांमध्ये कलाकृती
हळूहळू मातीद्वारे त्याने भगवान हनुमानाचे चित्र रेखाटले आहे. या व्हिडिओतील कलाकाराचे कौशल्या पाहून अनेक लोक कॉमेंट करत आहेत. अनेक हनुमानभक्त तर याचे चाहतेच ठरले आहेत. कलेतील परिपूर्णता पाहता तो अत्यंत उत्तम कलाकार असल्याचे स्पष्ट होते. काही मिनिटांमध्ये त्याने भगवान हनुमानाचे चित्र रेखाटले आहे.
व्हिडिओने जिंकली मने
या व्हिडिओने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. व्हिडिओ पाहून बहुतांश लोक स्वतःला कलाकाराची प्रशंसा करण्यापासून रोखू शकले नाहीत. काही सेकंदांच्या या व्हिडिओला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या केवळ 15 सेकंदांच्या व्हिडिओने लोकांना थक्क करून सोडले आहे.