हंस राज, चोंडल लडाख मॅरेथॉन विजेते
वृत्तसंस्था / लेह
येथे आयोजित केलेल्या 12 व्या लडाख मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या विभागात जम्मू काश्मिरच्या हंस राजने तर महिलांच्या विभागात लडाखच्या स्टॅनझीन चोंडलने विजेतेपद पटकाविले.
पुरूषांच्या विभागात हंस राजने 42 कि.मी. पल्ल्याची लडाख मॅरेथॉन 2 तास, 47 मिनिटे आणि 41 सेकंदांचा अवधी नोंदवित जिंकली. महिलांमध्ये स्टॅनझिन चोंडलरने 3:13:00 अवधी घेत जेतेपद मिळविले. या मॅरेथॉनला लेहच्या एनडीएस स्टेडियमपासून प्रारंभ झाला. भारतातील विविध राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील त्याचप्रमाणे 30 देशांतील सुमारे 6600 धावटपटूंनी आपला सहभाग दर्शविला होता.
लडाख हाफ मॅरेथॉनमध्ये पुरूषांच्या विभागात सितेन नमगेलने 1 तास 13 मिनिटे आणि 10 सेकंदांचा अवधी घेत तर महिलांच्या विभागात स्टेनझीन डोलकरने 1 तास 30 मिनिटे आणि 14 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. 11.2 कि.मी. पल्ल्याच्या मॅरेथॉनमध्ये महिलांच्या खुल्या गटात लेंझीसने 47 मिनिटे 30 सेकंदांचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. पुरूषांच्या विभागात एस. स्टेनझीनने 42 मिनिटे, 39 सेकंदांचा अवधी घेत विजेतेपद मिळविले.