For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हणजूण, आसगावात 19 भूखंड केले हडप

11:44 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
हणजूण  आसगावात 19 भूखंड केले हडप
Advertisement

जमीन हडप प्रकरण वाढता वाढेच : विशेष तपास पथकाकडून संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद 

Advertisement

पणजी : हणजूण आणि आसगाव येथील 19 भूखंड हडप केल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उघडकीस आणले आहे. ईडीच्या तक्रारीच्या आधारे संशयितांच्या विरोधात भादंसंच्या कलम 465, 467, 468, 471, आणि 420 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद सुहेल, राजकुमार मैठी, विक्रांत शेट्टी, कायतानो फर्नांडिस, मीना नाईक, ओंकार, पालयेकर, रामचंद्र दाबोळकर, सँड्रिक फर्नांडिस, रॉयसन रॉड्रिग्ज, धिवेश नाईक, शिवानंद मडकईकर, रिटा फर्नांडिस, सिद्धेश परब, सुनील कुमार व इतर अज्ञातांचा समावेश आहे. यापैकी अनेकांना यापूर्वी जमीन हडप प्रकरणात अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. गोव्यातील संयुक्त संचालक अनुप सिंग रौथन यांच्या तक्रारीच्या आधारे संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील संशयितांनी बनावट दस्तावेज तयार केले आणि हणजूण गावातील खऱ्या मालकांच्या जमिनींचे बनावट वारसदार, कागदपत्रे आणि विक्री करार तयार करून हणजूण येथील सर्व्हे क्रमांक. 215/6, 426/19, 426/20, 225/3, 494/4, 456/4, 339/2, 14/11, 213/22, 426/14, 214/2 आणि आसगाव गावातील सर्व्हे क्र. 40/2, 202/3, 201/3, 43/4, 149/1, 53/4, 124/1, 160/2 या भूखंडांची बनावट कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांसमोर सादर केली आणि मालकी हक्क हस्तांतरित करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे मालक वंचित राहिले. त्यांच्या कायदेशीर अधिकारांचा उपभोग घेण्यापासून त्यांना वंचित करून त्यांची फसवणूक करण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे. आतपर्यंत एकूण 31 भूखंड ईडीने जप्त केले आहेत. त्यातील या 19 मालमत्तांसंबंधीत पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.